21 C
New York

Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Published:

आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवल्याची घटना (Accident)  समोर आली आहे. या घटनेत दुचाकीवर असलेल्या एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झाला. पुणे-नाशिक महामार्गावर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला. कार चालवत आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या होता. त्याने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झालाय. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बोरिवलीत रस्ता खचल्याने ट्रक उलटला

मिळालेल्या माहितीनुसार, मोहितेंचा पुतण्या पुण्याच्या दिशेने जात होता. एका टू-व्हीलरच्या त्यावेळी समोरून येणाऱ्या कारची धडक बसली. अपघात भीषण होता. दुचाकीचा चुराडा झाला आहे, तर कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img