नैऋत्य मोसमी वार सक्रिय होऊ लागल्याने आजपासून कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. (Monsoon) तर दक्षिण कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भातही पाऊस जोर धरण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. (Rain) त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Monsoon अतिमुसळधार पावसाचा इशारा
विदर्भासह मराठवाड्यात आज पावसाला सुरुवात झाली होती. ऊन- सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम होता. ढगाळ हवामान, पावसाच्या हजेरीने कमाल तापमान ३९ अंशांच्या खाली आहे. कार शनिवार सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.७ अंश तापमानाची नोंद झाली.
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
Monsoon पुणे जिल्ह्यात उद्यापासून
शहर आणि जिल्ह्यात उद्यापासून म्हणजे सोमवारपासून मॉन्सून सक्रिय होणार आहे. पावसाचा मोठा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील आठवडाभर तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत देण्यात आले आहेत. नैऋत्य मोसमी वारे शहरात दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं पाहायला मिळालं होतं. घाटमाथ्यावर अजूनही संततधार पावसाची प्रतीक्षा असून, जिल्ह्याच्या पूर्व भागातही जोरदार पावसाने ओढ दिली आहे.
Monsoon या जिल्ह्यात पाऊस
जूनच्या शेवटच्या आठवड्यात तरी शेतीयोग्य पाऊस पडेल, असा अंदाज आहे. शनिवारी शहरात दिवसभर ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळाला. मात्र, आज रविवार आकाश सामान्यतः ढगाळ आणि दपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत हलका पाऊस पडला. तर यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत मध्यम पाऊस झाला आहे.