26.6 C
New York

IND vs BAN: आजच्या सामन्यामध्ये पावसाने व्यत्य आणला तर…

Published:

T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीतील आजचा सामना IND vs BAN भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अफगाणिस्तानचा पराभव करून भारताने सुपर 8 ची सुरुवात केली आहे, आता ते उपांत्य फेरीचे तिकीट बुक करू पाहत आहेत. आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यानंतर एका संघाच्या आशा पल्लवित होऊ शकतात तर दुसरा संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ जाईल. आजच्या सामन्यामध्ये पावसाने व्यत्य आणला तर जाणून घेऊया भारत-बांगलादेश सामन्याशी संबंधित सर्व समीकरणे काय असतील?

‘या’ खेळाडूंमुळे सौरभ भारतीय संघाबाहेर ?

भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याचे ध्येय बाळगून कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. हे जेतेपद त्यांच्यासाठी शेवटचा टी-२० विश्वचषक म्हणून संस्मरणीय ठरू शकतो. भारताने सुपर 8 पर्यंत दमदार कामगिरी दाखवली आहे. लीग स्टेजपासून टीम अपराजित आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने विजयाची नोंद केली असून आता बांगलादेशचा संघ समोर आहे. या मैदानावर शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात झाला होता. या सामन्यादरम्यान पावसामुळे व्यत्यय आला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातही हे चित्र पाहायला मिळू शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अँटिग्वा वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. अँटिग्वा वेळेनुसार सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान तापमान सुमारे 30 अंश असेल. यावेळी 18 ते 24 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, परंतु पावसामुळे सामना पूर्णपणे रद्द होणार नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांचे १-१ गुण मिळतील. याचा भारतीय संघाला फायदा होणार असला तरी बांगलादेशसाठी करो किंवा मरोची स्थिती त्यांच्या पुढच्या सामन्यात असेल. भारताने एक सामना जिंकला असून दुसरा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होईल. सामना रद्द झाल्यास भारताला ३ गुण मिळतील तर बांगलादेशला १ गुण मिळेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img