-1.1 C
New York

Maratha Kunbi : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वादळी वाटप

Published:

मराठा आरक्षणासाठी गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अनेकदा आंदलन झालं आहे. सध्या मनोज जरांगे पाटलांनी मोठ आंदोलन उभं केलं आहे. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेत आहे. (Maratha Kunbi ) जरांगे पाटलांनी मोठा लढा उभा केल्याने राज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यानंतर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपही सुरु करण्यात आलं. (Maratha Reservation) सध्या आवश्यक कागदपत्रांआधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु आहे. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी सगे-सोयऱ्याची अंमलबजावणीसाठी सरकारला धारेवर धरलं आहे. तर बोगस कुणबी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे उपोषणाला बसले आहेत. (Obc Reservation) त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटप करताना सरकार पेचात अडकलं आहे.

Maratha Kunbi 1 लाख 40 हजार

आता मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये 9 महिन्यात तब्बल 1 लाख 40 हजार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाच्या 45 हजार 431 कुणबी नोंदी सापडल्या होत्या. 45 हजार कुणबी नोंदीच्या आधारे 1 लाख 40 हजार जणांना कुणबी प्रमाणपत्रं मिळाली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. अजून ही प्रक्रिया सुरु आहे.

Maratha Kunbi सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी

जर सगे सोयऱ्यांचा जीआर लागू झाला तर कोट्यवधी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सरकारने यावर्षाच्या सुरुवातीला जरांगे पाटील यांना याविषयीचं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलकांना शब्द दिला होता.

Maratha Kunbi आंदोलनामुळे तिढा

मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. त्यावेळी सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची यशस्वी मनधरणी केली. पण त्यानंतर ओबीसी आंदोलन बचाव अंदोलन वडीगोद्री येथे सुरु झालं. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे सरकारपुढे आता नवा तिढा निर्माण झाला आहे. कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटपाबाबत सरकारपुढे मोठा प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे.

ओबीसींच्या मंचावरून छगन भुजबळांचा एल्गार

Maratha Kunbi नऊ लाख प्रमाणपत्र निघण्याचा अंदाज

एका पुराव्याच्या आधारे 20 प्रमामपत्रे देता येऊ शकतात. उपलब्ध नोंदीनुसार सुमारे 9 ाख प्रमाणपत्र मराठवाड्यात आगामी काळात वितरित होऊ शकतात. नवीन नोंदी सध्या सापडत नाहीत. प्रमाणपत्रांचे जसे अर्ज येत आहेत तसे वितरण करण्यात येत आहे असं प्रभारी विभागीय आयुक्त जगदीश मिनियार यांनी सांगितलं.

Maratha Kunbi नोंदीसाठी काय तपासलं?

खासरापत्र, पाहणीपत्र, क-पत्रक, कुळ नोंदवही, 1951 चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्र, फेरफार पत्र, 7/12, गावनमुना, प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील 13 प्रकारचे दस्तावेज, भूमी अभिलेखमधील 7 दस्तावेज, मुंतखब इत्यादी यासाठी तपासलं जात.

Maratha Kunbi जिल्हानिहाय कुणबी प्रमाणपत्र वाटप

बीड – 90946 (सर्वाधिक)
संभाजीनगर – 10744
जालना – 10014
परभणी – 9374
हिंगोली – 4719
धाराशिव :- 9654
नांदेड -2760
लातूर – 1745 (सर्वात कमी)

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img