साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. (Udayanraje Bhosale) नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या पार पडलेल्या चुरशीच्या लढाईत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. (Manoj Jarange) त्यानंतर आपण विजय खेचून आणला या भावनेतून उदयनराजे भोसले यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.
Udayanraje Bhosale आम्ही एकत्र आलोय
उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत यांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असं सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिलं. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत, असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
तिवसा मतदारसंघात भाजपची अग्निपरीक्षा!
Udayanraje Bhosale चुरशीच्या लढाईत विजय
सातारा लोकसभा निवडणुकीच्या लढाईत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा 32,217 मतांनी पराभव केला. सातारा लोकसभेत पिपाणी या चिन्हाने शशिकांत शिंदे यांचा घात केला. पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37,062 मतं मिळाली. हीच मतं उदयनराजे भोसले यांच्यादृष्टीने निर्णायक ठरली.
Udayanraje Bhosale दिल्लीत तळ ठोकून बसले होते
उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीत तळ ठोकून बसले होते. अनेक प्रयत्नांती त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन भाजप नेतृत्त्वाने त्यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली. मात्र, शरद पवार यांचं आव्हान असल्यामुळे उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्याची लढाई अवघड मानली जात होती. परंतु, उदयनराजे भोसले यांनी या चुरशीच्या लढाईत बाजी मारत साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.