26.6 C
New York

IND vs BAN: बांगलादेशला नमवत भारताने आपला उपांत्य फेरीचा मार्ग केला सोपा…

Published:

T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीतील आजचा सामना IND vs BAN भारताने सहज आपल्या खिशामध्ये घालत उपांत्य फेरीमध्ये जाण्याचा आपला मार्ग अजून सोपा करून घेतला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीला पाचारण केले होते. भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत पहिल्यापासून सामन्यावर वर्चस्व कायम ठेवले. हार्दीक पंड्याच्या जलद अर्धशतकच्या जोरावर भारताने बांगलादेशला १९७ धावांचे बलाढ्य आव्हान दिले. बांग्लादेश फलंदाजांनी आपापल्या परीने खेळपट्टीवर आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले पण, कुलदीपच्या फिरकीसमोर कोणीच जास्त वेळ टिकू शकले नाही. कर्णधार शांतोने एक बाजू सांभाळत सामन्यामध्ये जीव कायम ठेवण्याचे काम केले असले तरी, भारतीय संघासमोर कोणीच काही करू शकत नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.

भारताकडून रोहित शर्मा ११ चेंडूत २३ धावा, विराट कोहली २८ चेंडूत ३७ धावा, सूर्यकुमार २ चेंडूत ६ धावा, रिषभ पंत २४ चेंडूत ३६ धावा, शिवम दुबे २४ चेंडूत ३४ धावा, हार्दिक पांड्या २७ चेंडूत ५० धावा चे योगदान संघासाठी करत १९६ धावांचा डोंगर उभा केला गेला.

पश्चात फलंदाजी करताना बांगलादेशचे एका मागोमाग एक खेळाडू ये-जा करत राहिले. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीपने संघामध्ये पुनरागमन करताना आपली जादू दाखवली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img