21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पूर्ण (International Yoga Day) भारतातच नव्हे तर विश्वात साजरा केला जातो. बहुतेक ठिकाणी योगासनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे लक्ष ठेवून दिनांक 20 जून रोजी नाशिक येथे श्री बाळू मोकल यांनी बर्फावर जास्तीत जास्त योगासने करण्याचा विक्रम केला आहे.
योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं नाशिकचे योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी 750 किलो बर्फावर उणे 10 अंश सेल्सीअस तापमानात 71 आसने करुन एक आगळावेगळा उपक्रम आणि विक्रम आपल्या नावे केला आहे. या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने देखील नोंद घेतली आहे. त्यांच्या या रेकॉर्डची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सूक्ष्म नार्वेकर यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. होती. त्यांच्या या अनोख्या विक्रमामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडिया चा चीफ एडिटर सुषमा नार्वेकर या समाजामध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या अशा अनेक व्यक्तींना व्यासपीठ देऊन संजीवनी देण्याचे काम करत आहेत. म्हणूनच बाळू मोकल यांनी बर्फावर केलेल्या योगासनाची दखल घेऊन त्यांना रेकॉर्डसच्या मार्फत एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे.