26.6 C
New York

Laxmikant Dixit : राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

Published:

अयोध्या येथील मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे , या सोहळ्यात सहभागी होऊन 121 वैदिक ब्राह्मणांचं नेतृत्व करणारे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं (Laxmikant Dixit) आज सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 86 वर्षांचे होते. ही बातमी कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली. गेल्या अनेक वर्षांपासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला. अनेकांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पूजा पूर्ण झाल्या. त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यही या पूजेत सहभागी झाले होते. तसेच डिसेंबर 2021 मध्ये काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या पूजेतही ते सहभागी झाले होते.

कोणी कितीही शड्डू ठोका, उदयनराजेंनी दंड थोपाटले

Laxmikant Dixit  महाराष्ट्राशी होतं खास नातं

आज सकाळी लक्ष्मीकांत दीक्षित यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. प्रत्येक प्रकारच्या पूजा विधिमध्ये ते पारंगत होते. त्यांनी वेद आणि अनुष्ठानांची दीक्षा आपले चुलते गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून घेतली होती. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे महाराष्ट्राशी जवळचे नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामध्ये दीक्षित यांच्या पूर्वजांचाही सहभाग होता असं सांगितलं जातं. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी श्रध्दांजली वाहिली आहे. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर सनातन परंपरा पाळणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img