महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय गंभीर बनला आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्याव या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. पण यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची भिती आहे. त्यामुळे जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, या मागणीसाठी सरकारच शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी तिथे गेलं आहे. यावेळी नवनाथ वाघमारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. लढाई संपलेली नाही. निवडणुकीच्या आधी सुद्धा, निवडणुकीनंतरही गावागावत हल्ले करण्यात आले. मारपीठ करण्यात आली. पोलिसांनी डोळेझाक केली. हे सर्व पाहून वेदना झाल्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये धनशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती नाही तर लोकशक्ती अत्यं मोठी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
OBC Reservation जातजनगणनेची मागणी
शेळ्या मेंढ्या मोजता तर माणसांची मोजदाद का करत नाही. आमची जात गणना केली पाहिजे. काही मागितलं तर कोर्टात जातात. कोर्ट विचारतं तुम्ही किती टक्के आहात. आम्ही आकडा कसा सांगायचा. ब्रिटिशांनी गणना केली तेव्हा ५४ टक्के होतो. मग आम्ही १०-१२ टक्के आहोत असं कसं म्हणता. करा जातगणना. नितीश कुमारांनी जातजनगणना केली. आम्ही ६५ टक्क्यावर गेलो. आम्ही जातीयवाद केला नाही. त्यांनी जातीयवाद केला, असं म्हणत छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे.
महात्मा फुल्यांनी जे सांगितलं ते शाहू महाराजांनी सांगितलं. ते बाबासाहेबां संविधानात आणलं आणि आम्हाला न्याय दिला. आमची सर्व लेकरंबाळं काही गाड्यातून फिरत नाही. ते ही अन्नाला मोताद आहे. त्यांची काय परिस्थिती आहे. त्यासाठी हे आरक्षण आहे. त्यात इतर वाटेकरी झाले तर आमचे काय होणार, असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसींची परिस्थिती विशद केली.
“भाजपनेच शिंदेंचा गेम केला”; बच्चू कडूंचा पुन्हा घरचा आहेर
OBC Reservation छगन भुजबळांचं आवाहन काय?
तुम्ही सर्व एकत्र राहिलं तर आरक्षण टिकेल. तुम्ही कोणत्या पक्षात आहात याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. मजबुतीने उभं राहा. ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देऊ नका. केवळ मतांसाठी हे करणार आहात का. मतांसाठी घाबरू नका. तुम्ही ५४ टक्के एक राहिला तर मुस्लिम, दलित आणि आदिवासी तुमच्यासोबत राहतील. तुम्ही आपआपसात लढत राहिला तर काहीही होणार नाही. एकत्रित या. तू मोठा मी मोठा हा भेदभाव नाही. आपण सर्व सारखे असं समजून कामाला लागा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं आहे.
OBC Reservation अती झाल्यानंतर माती व्हायला सुरुवात होते’
“आपल्यापेक्षा आपल्या देशाचे नेते, श्रद्धास्थान, आधरस्तंभ भुजबळ साहेबांना काय त्रास झाला? भुजबळ साहेबांवर काय कमेंटस केल्या? त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं. कुठल्याही गोष्टीचा टायमिंग असतो. कुठली गोष्ट अती झाल्यानंतर माती व्हायला सुरुवात होते. ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याच काम यांनी केलं. आपल्या लोकनेत्या पंकजाताई साहेब या कुठल्याही मोर्च्याला आल्या नव्हत्या, कुठल्याही मेळाव्यात आल्या नाही, तरी यांनी जातीयवाद करुन टार्गेट करुन पाडण्याच काम केलं. गोपीनाथ मुंडे साहेबांनी कुणाची जात न पाहता आमदार-खासदार घडवले” असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
OBC Reservation ‘इंडिया आघाडीच्या विजयाच श्रेय मुस्लिम, दलित बांधवांना’
“इंडिया आघाडीच्या विजयाच श्रेय मुस्लिम, दलित बांधवांना जातं. कारण भाजपा संविधान विरोधात आहे, मुस्लिम विरोधी आहे असा प्रचार करण्यात आला. त्याचा भाजपाला फटका बसला. कोणीतरी याच श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना श्रेय देऊ नये” असं नवनाथ वाघमारे म्हणाले.