0.7 C
New York

Vidhansabha Elections : तिवसा मतदारसंघात भाजपची अग्निपरीक्षा!

Published:

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Elections) वेध लागले. सर्वच पक्षांनी आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात ताकतवान पक्ष असल्याचं दिसून आलं. मात्र, आता कॉंग्रेसच्या विद्यमान आमदारांची विधानसभेच्या निमित्ताने खरी कसोटी लागणार आहे. दरम्यान, बळवंत वानखडेंच्या (Balwant Wankhade) विजयात महत्वाची भूमिका असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा विधानसभा (Tivasa Election) मतदारसंघात काय परिस्थिती आहे? याचाच आढावा घेऊ.

Vidhansabha Elections मतदारसंघाचा इतिहास

तिवसा मतदारसंघ हा मेळघाटानंतर अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांवर राजकीयदृष्ट्या कोणत्याच एका पक्षाचे वर्चस्व राहिले नसल्याचा इतिहास आहे. 1978 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये चार वेळा काँग्रेसने बाजी मारली होती. तर 1978 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्याच मात्र अपक्ष राहिलेल्या चंद्रकांत ठाकूर यांनी तर एकवेळा भाकपच्या भाई इंगळे यांनी 1990 मध्ये विजय संपादन केला. 1999 आणि 2004 मध्ये सलग दोनदा भाजपचे साहेबराव तट्टे यांनी विजय मिळवला होता.

Vidhansabha Elections यशोमती ठाकूर तीन टर्म आमदार

2009 मध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवत भाजपचे वर्चस्व मोडीत काढले. 2014 च्या मोदी लाटेतही यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवले होते. तिवसा मतदारसंघात मोर्शी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, भातकुली आणि अमरावती तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो.

Vidhansabha Elections 2014 -2019 च्या परिस्थिती काय ?

2014 मध्ये तिवसा मतदारसंघात भाजपने निवेदिता चौधरी यांना उमेदवारी दिली होती, भाजपचे माजी आमदार साहेबराव तट्टे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, तर शिवसेनेचे दिनेश वानखडे हेही रिंगणात होते. मोदी लाट असतानाही यशोमती ठाकूर मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने राजेश वानखडेंना मैदानात उतरवलं होतं. या निवडणुकीतही यशोमती ठाकूर यांनी पराभवाची धुळ चारली होती.

टोमॅटोचे दर शंभरी गाठण्याची शक्यता

Vidhansabha Elections मतदारसंघावर यशोतमी ठाकूर यांची एकहाती पकड

ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या तिवसा विधानसभा मतदारसंघातून ‘हॅटट्रिक’ साधणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना 10 हजार 546 मतांची आघाडी मिळवून देत विरोधकांना अस्मानच दाखविले. एकंदरीत प्रमुख उमेदवारांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज केली तर ठाकूर यांचीच मतदारसंघावर एकहाती पकड असल्याचे स्पष्ट होतं.

Vidhansabha Elections मतदारसंघातील जातीय समीकरणे…

मराठा, माळी आणि मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने जास्त असली तरी हा मतदारसंघ बहुजातीय आणि बहुभाषिक आहे. कोणत्याही एका जातीचं वर्चस्व या मतदारसंघात नाही. मात्र, मराठा आणि मुस्लिम मतदार कॉंग्रेससोबत असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं. या मतदारसंघातून बळवंत वानखडेंना भरपूर मतं मिळाली, त्यामुळं या मतदारसंघाताील मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं सिध्द झालं होतं.

Vidhansabha Elections कॉंग्रेसकडून यशोमती ठाकूरच लढणार?

यशोमती ठाकूर यांचा जिल्ह्यात मोठा दबदबा आहे. लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखडे यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. उमेदवारीपासून तर विजयापर्यंत त्यांनी ‘मायक्रोप्लॅनिंग करत वानखडेंना विजयी केलं. त्यामुळं कॉंग्रेसकडून यशोतमी ठाकूर यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Vidhansabha Elections प्रकाश साबळे वाढवणार यशोमती ठाकूरांचे टेन्शन…

काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांचाही वलगाव, भातकुली भागात चांगला जनसंपर्क आहे. ते देखील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. त्यांना तिकीट मिळालं नाही तर ते देखील अपक्ष निवडणूक लढू शकतात. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यास नवनीत राणा आणि आमदार रवी राणा त्यांना मदत करू शकतात.

Vidhansabha Elections भाजपात वाढली इच्छुकांची गर्दी

महाविकास आघाडीच्यावतीने कॉंग्रेसकडून यशोमती ठाकूर यांचीच उमेदवारी निश्चित मानली जाते. याउलट स्थिती महायुतीमध्ये आहे. विशेषत: भाजपकडून निवेदिता चौधरी आणि प्रा. दिनेश सूर्यवंशी हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहे. याशिवाय, राजेश वानखडे, रविराज देशमुख, छाया दंडाळे, ज्योती यावलकर हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळं गटबाजी होण्याची शक्यात आहे. याशिवाय, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे हे देखील तिवसा मतदारसंघातून आमदारकीची तयारी करीत आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणं कशी जुळतात, यावरही बऱ्याच गोष्टी अंवलंबून आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img