9.5 C
New York

International Yoga Day : योग दिनाचं महत्व काय?

Published:

दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा (International Yoga Day) केला जातो. या माध्यमातून लोकांमध्ये प्राचीन भारतीय योग परंपरेबाबत जागृती केली जाते. चला तर मग जाणून घेऊ या योग दिवसाचं महत्त्व आणि योग दिवसाची यावर्षीची थीम नेमकी काय आहे. दरवर्षी 21 जून रोजी जगभरात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. योगाचे महत्त्व आणि फायद्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानेच हा दिवस साजरा केला जातो. योग फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

आजमितीस भारताने योगाला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. तसेच योगाच्या माध्यमातून सांस्कृतिक एकतेलाही चालना दिली आहे. शारीरिक व्याधींना दूर ठेवण्याबरोबरच मानसिक आरोग्य चांगले राखण्यास योगामुळे मोठी मदत होते. मानवी जीवनात योगाच काय महत्व आहे याची माहिती लोकांना होऊ लागली आहे. मात्र या दिवसाची सुरुवात कधी झाली आणि दरवर्षी हा दिवस का साजरा केला जातो याची माहिती असणेही गरजेचे आहे. दरवर्षी योग दिवस एक नवीन थीम घेऊन साजरा केला जातो.

International Yoga Day अशी सुचली योग दिनाची आयडीया?

भारताला योगगुरू बनवण्याच श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जातं. त्यांनी 14 सप्टेंबर 2014 रोजी एका सभेदरम्यान योग दिवस साजरा करण्याचा उल्लेख केला होता. त्याच वर्षात 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र सभेने (United Nations) मोदींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या बरोबरच 21 जून या दिवशी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जगातील 177 देशांनी या प्रस्तावाला समर्थन दिले होते.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी

International Yoga Day पहिल्यांदा केव्हा साजरा झाला योग दिवस?

21 जून 2015 या दिवशी पहिल्यांदा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला होता. या दिवशी जगातील लाखो लोकांनी सामूहिकपणे योग केला होता. या दिवशी भारतात दिल्लीतील (New Delhi) राजपथ येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास 35 हजार नागरिक सहभागी झाले होते.

International Yoga Day 2024 च्या योग दिनाची थीम काय?

प्रत्येक वर्षात एका खास थीमसह योग दीन साजरा केला जातो. यावेळची थीम देशातील महिलांना समर्पित आहे. जागतिक योग दिवस 2024 ची थीम महिला सशक्तीकरणासाठी योग अशी आहे. या थीम अंतर्गत आज जगभरात विविध उपक्रम घेतले जात आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img