4 C
New York

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविना महायुती विधानसभा लढणार?

Published:

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत (Maharashtra Politics) उठापटक सुरू आहे. निवडणुकीतील पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी केली होती. वरिष्ठांना तशी विनंतीही केली होती. मात्र पक्षश्रेष्ठींना त्यांचा हा निर्णय रुचला नाही. राजीनामा देऊ नका, काम सुरुच ठेवा असा मेसेज त्यांना दिल्लीश्वरांनी दिला. या घडामोडींनंतर फडणवीसांच्या राजीनाम्याच्या खेळीतील हवा पक्षश्रेष्ठींनी काढून टाकली म्हणण्यास हरकत नाही. त्यांचा राजीनामा नाकारला असला तरी पक्षात एकाधिकारशाही चालणार नाही अशी तंबी देण्यासही पक्षश्रेष्ठी चुकलेले नाहीत.

आता भाजपने असा (Election 2024) निर्णय घेतला आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून कुणालाही प्रोजेक्ट केले जाणार नाही. जर महायुती पुन्हा सत्तेत आली तर नंतर या मुद्द्यावर निर्णय घेतला जाईल. तसेच नेत्यांना तंबी देण्यात आली आहे आपल्या मित्रपक्षांची मनं सांभाळा. ते नाराज होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्या कारण या निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या स्थितीत भाजप नाही. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी आता मायक्रो प्लॅनिंगवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. याबाबत द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या बैठकीत फडणवीसांना हा इशारा दिला. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या आधी राज्यात कोणताही बदल केला जाणार नाही असा निर्णय घेतल्याची माहिती गोयल यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. 23 जागा जिंकणारा भाजप फक्त 9 जागांवरच थांबला. केंद्रीय मंत्र्‍यांनाही पराभवाचा फटका बसला. राज्यात काँग्रेसने 14 जागा जिंकत नंबर एकचा पक्ष होण्याचा मान मिळवला. या निवडणुकीत भाजपने 28 उमेदवार दिले होते. फक्त 9 उमेदवार विजयी झाले.

भारतीय जनता पार्टीच्या या खराब कामगिरीवर पक्षनेतृत्वाने नाराजी व्यक्त केली. राज्यातील नेत्यांना कठोर शब्दांत फटकारले. भाजपाचं चुकलं कुठं याची माहिती श्रेष्ठींनी घेतली. तसेच महाराष्ट्रात कोणा एकाच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा. जुन्या नेत्यांना सोबत घ्या. इच्छुक उमेदवारांना आतापासूनच तयारी करायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका, असेही दिल्लीतील वरिष्ठांनी सांगितले.

सरकारची ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा हवेत विरली!

Maharashtra Politics महाराष्ट्र भाजप नेत्यात समन्वयाचा दुष्काळ

राज्यात लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी अनेक नरेटिव्ह पसरवले. यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. विरोधकांचा हा नरेटिव्ह खोडून काढण्यात भाजपाचे नेते कमी पडले. या नेत्यांना, सोशल टीमला पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडता आली नाही. विरोधकांनी भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देता आलं नाही. विरोधकांनी सोशल मीडियात जे मुद्दे मांडले त्यांची उत्तरं देण्यात भाजप नेते कमी का पडले? असा सवाल पक्षनेतृत्वाने या बैठकीत विचारला. आता निदान विधानसभा निवडणुकीत तरी यात सुधारणा करा. सोशल मीडियाचा वापर अधिक प्रभावीपणे करा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

Maharashtra Politics आंदोलने नीट हाताळली नाहीत, अहंकारी होऊ नका

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्तेत असतानाही भाजपला चांगले प्रदर्शन करता आले नाही. राज्यात सुकाणू समितीच्या बैठका नियमित का होत नाहीत असा प्रश्न या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय का घेतला नाही असाही प्रश्न या बैठकीत विचारण्यात आला. मराठा आंदोलन हाताळण्यात राज्यातील नेते कमी पडले यामुळे मराठा समाज भाजपवर कमालीचा नाराज झाला. आता या परिस्थितीवर लवकरात लवकर सुधारणा करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्या. तसेच आपल्या वागणुकीत अहंकार येऊ देऊ नका असेही नेतृत्वाने सुनावले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img