23.1 C
New York

Recruitment : सरकारची ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा हवेत विरली!

Published:

मोठ्या आवेशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार जागांच्या महाभरतीची (Exams) घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने ही भरती रखडल्याचं दिसून आलंय. (Recruitment) वारंवरावर रखडल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Mpsc) त्यातच शासन सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्याच्या विचारात असल्याने उमेदवारांच्या अस्वस्थेव मिठ चोळल्यासारखं होत आहे.

Recruitment भरती प्रक्रिया सुनियोजित नाही

राज्यातील १५ पेक्षा अधिक विभागांतील भरती प्रक्रियाच घोषित झालेली नाही. तर तलाठी आणि जिल्हा परिषदेची भरती परीक्षा होऊनही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेलं नाही. याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या अनेक लोकांनी राज्यातील एकही भरती प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने झाली नसल्याचं भयानक विदारक सत्य सांगितलं आहे.

Recruitment विद्यार्थी सत्ताधाऱ्यांवर संतप्त

सरकारने ७५ हजार जागांच्या भरतीची घोषणा केली. मात्र, अजूनही अनेक जागांची भरती रखडली आहे. दरम्यान, राज्यात दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. रखडलेल्या भरतीमुळे विद्यार्थी सत्ताधाऱ्यांवर संतप्त आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेत विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचंही विद्यार्थ्यांचं मत आहे.

राज्यातील विविध सरळसेवा भरती प्रक्रिया सर्व नोकरभरती ‘एमपीएससी’द्वारेवेगवेगळ्या कारणाने वादात सापडल्या आहेत. खासगी संस्थांनी गैरव्यवहार केल्याचं अनेक भरती प्रक्रियेत उघड झालं आहे. भरती प्रक्रियेसाठी सेवा प्रवेश नियमांत म्हणून पारदर्शक आणि विश्‍वासार्ह सुधारणा करण्यात आली आहे. ज्याद्वारे सर्व पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून होणार आहे. मात्र, त्याबद्दल कोणतीच कारवाई झालेली नाही.

योग दिनाचं महत्व काय?

Recruitment जाहिरात येणे बाकी

पदनाम – कनिष्ठ अभियंता
जलसंपदा विभाग
बृहन्मुंबई महानगरपालिका
पाणीपुरवठा विभाग
नियुक्ती रखडलेली
नगरपरिषद
ग्रामविकास विभाग
जलसंपदा विभाग

Recruitment अर्ज भरले पण वेळापत्रक नाही

न्यायवैद्यक विभाग
आदिवासी विकास विभाग
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
सिडको

नवीन जाहिराती अपेक्षित
संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात २०२४
सामाजिक न्याय विभाग
नगरपरिषद किंवा नगरपंचायत गट ‘क’ व गट ‘ड’
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
वित्त व लेखा कोषागार विभाग
नाशिक महानगरपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिका
अहमदनगर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
कल्याण -डोंबिवली महापालिका
चार कृषी विद्यापीठांच्या जाहिराती
महाबीज महामंडळ
महाराष्ट्र वखार महामंडळ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img