9.5 C
New York

Sonakshi Sinha: अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन!

Published:

Sonakshi Sinha: बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) येत्या रविवारी २३ जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईमध्ये दोघांचं लग्न होणार असून लग्नाची तयारी एकदम जोरदार सुरु आहे. अशातच आता सोनाक्षीचा होणार नवरा झहीर इक्बाल सोनाक्षीच्या कुटुंबासोबत दिसला. गेल्या रविवारी सोनाक्षी झहीरच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतानाचे फोटो समोर आले होते, आणि आता झहीर सोनाक्षीच्या कुटुंबासोबत दिसल्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sonakshi Sinha: सोनाक्षीने लग्नबद्धल आधी घरी न सांगितल्यामुळे तिचे वडील, दिग्गज अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) हे लेकीवर नाराज असल्याच्या अफवा होत्या. याबद्धल सर्व माहिती दिल्यानंतर २ दिवस आधी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी शत्रुघ्न सिन्हा झहीर इक्बालबरोबर पहिल्यांदाच समोर आले. दोघांनीसुद्धा हसत हसत कॉम्प्लेक्सच्या बाहेत पापाराझींना पोज दिल्या.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी

गुरुवारी संध्याकाळी बरेच पापाराझींनी झहीरचे सोनाक्षीच्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट्सवर शेअर केले. या फोटो आणि व्हिडिओमध्ये सोनाक्षी, तिचे आई-वडील आणि झहीर एकत्र दिसले. तर शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या जावया सोबत म्हणजेच झहीर इक्बालसोबत पहिल्यांदाच पोज दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर शत्रुघ्न यांनी झहीरला पापाराझींसमोर मिठी सुद्धा मारली. यावेळी दोघेही खूप खुश दिसत होते. पापाराझींनी त्यांना थांबून पोज देण्यास सांगितलं आणि ते ‘खामोश’ असं म्हणाले. यावेळी सोनाक्षीची आई पूनम सिन्हाही त्यांच्यासोबत होत्या. सोनाक्षी सुद्धा कुटुंबाला भेटली. तिच्या लग्नाच्या चर्चा जेव्हापासून सुरु आहेत तेव्हापासून ती पहिल्यांदाच पापाराझींच्या कॅमेऱ्यात दिसली आहे. सोनाक्षी तिच्या कारमधून उतरली आणि लगेचच अपार्टमेंटमध्ये गेली, ती तिथे थांबली नाही.

अखेर नाराज असल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हांनी दिली प्रतिक्रिया
अखेर शत्रुघ्न सिन्हांनी गुरुवारी सकाळी लाडक्या लेकीच्या लग्नाबद्दल नाराज असल्याच्या अफवांवर मौन सोडलं आहे. दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हंटल की, “मला एक सांगा, हे कोणाचं आयुष्य आहे नक्की? हे आयुष्य माझ्या एकुलत्या एक मुलीचं आहे, जिचा मला खूप अभिमान आहे आणि कायम राहील. माझं माझ्या लेकीवर खूप प्रेम आहे. ती मला तिचा आधारस्तंभ मानते. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नक्कीच असेन. मी का जाऊ नये? लेकीचा आनंद आहे हाच माझा आनंद आहे आणि माझा जो आनंद आहे तो तिचा आहे. तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा आणि तिच्या लग्नाचे इतर सर्व निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.”

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली, “मी माझ्या राजकीय कामांमुळे दिल्लीत होतो, पण मी आता मुंबई आहे. यासगळ्यावरून मला एकच दिसत कि मी फक्त तिचा आधारच नाही तर कवच आहे. त्या दोघांना एकत्र संसार करायचा आहे आणि सोनाक्षी आणि झहीर सोबत खूप छान दिसतात,” असं शत्रुघ्न सिन्हां यांनी म्हंटल आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img