प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर
ओबीसी आंदोलनाच्या (OBC Reservation) मंचावरून अश्रू ढाळणाऱ्या विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांना मराठा समाजातील तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले तेव्हा रडू का आले नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. आंदोलकांची अवस्था पाहून गहिवरलेल्या वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधून ओबीसी आंदोलनाच्या गांभीर्याची जाणीव करून दिली. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना टार्गेट केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणासाठी मराठा समाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी विरोधी पक्ष नेत्याचे मन गहिवरले नाही. आज मात्र पाणी आले. चांगले आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : खडसेंची फडणवीसांना धक्का देत कमबॅकची तयारी?
जरांगे म्हणाले कि, चंद्रकांत पाटील म्हणतात, सगेसोयरे अंमलबजावणी करण्याची गरज नाही; पण, सरकारने आमचे म्हणणे लक्षात घ्यावे. आम्ही दिलेली सगेसोयऱ्याची व्याख्या मान्य असेल तर त्याची अंमलबजावणी करा, असे माझे मुख्यमंत्री आणि शंभुराज देसाई यांना आवाहन आहे. चंद्रकांतदादा म्हणतात तसे करू नका; नाहीतर आमची फसवणूक होईल. शिष्टमंडळासमोरच सगेसोयरेची व्याख्या ठरली होती, मग आता का शब्द बदलताय, असा संतापही जरांगेंनी व्यक्त केला.