19 C
New York

Swiss banks : एकाच वर्षात स्वीस बँकांमधील भारतीयांची ‘माया’ कमालीची घटली

Published:

स्वीस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कमालीची घट झाली आहे. 2021 च्या तुलनेत यंदाच्या पैशांमध्ये 70 टक्के घट झाली आहे. 2021 मध्ये स्वीस बँकांमधील भारतीयांचा पैसा 3.83 अब्ज स्वीस फ्रँक एवढा प्रचंड वाढला होता. गत 14 वर्षांमधील तो उच्चांक होता. मात्र आता या पैशांमध्ये घट होऊन 1.04 अब्ज स्वीस फ्रँक म्हणजे 9 हजार 771 कोटी रुपयांवर आला आहे.

स्वित्झरलँडची केंद्रीय बँक ‘स्वीस नॅशनल बँके’ने (एसएनबी) जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. भारतीयांनी स्वीस बँकांत ठेवलेला पैसा हा रोख रकमेशिवाय रोखे आणि अन्य वित्तीय साधनांच्या स्वरूपात आहे. काही पैसा स्वित्झरलँडमधील बँकांत ‘ग्राहक ठेव खात्या’त आहे. तर काही पैसा स्वीस बँकांच्या भारतीय शाखांतही आहे. या सर्वच स्वरूपातील रकमेत घसरण झाली आहे. (Money deposited by Indians in Swiss banks has decreased significantly this year)

वटपौर्णिमेच्या दिवशी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

Swiss banks कोणत्या स्वरुपात किती आहे रक्कम?

स्वीस बँकांतील भारतीयांची एकूण रक्कम : 1.04 अब्ज स्वीस फ्रँक

■ ग्राहक ठेवी : 31 कोटी स्वीस फ्रँक.

■ अन्य बँकांच्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवी : 42.07 कोटी स्वीस फ्रँक.

■ न्यास अथवा ट्रस्टच्या ठेवी : एक कोटी स्वीस फ्रँक.

■ रोखे व अन्य वित्तीय साधने : 30.2 कोटी स्वीस फ्रँक.

Swiss banks निवडणुकीत वापरला गेला पैसा?

भारतात 2024 हे निवडणुकीचे वर्ष होते. लोकसभेची पंचवर्षिक निवडणूक याच वर्षी पार पडली. यंदाच्या निवडणुकीत साधारण 1.35 लाख कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. सर्वसाधारणपणे भारतातील उद्योगपती, नेते, अभिनेते यांचे पैसे स्वीस बँकांमध्ये असतात. स्वीस बँकेतील रक्कमही यंदाच्याच वर्षी कमी झाल्याने हा पैसा निवडणुकीसाठी वापरला गेला? असा प्रश्न उपस्थित होतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img