संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना गेल्या महिन्यात २० मे रोजी हायस्पीड पोर्श कार (Porsche accident) चालवून दोघांना चिरडून ठार करणाऱ्या अल्पवयीन मुलाबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त केले आहे. ही घटना गेल्या महिन्यात पुण्यात घडली होती. या अपघातात अनिश दुडिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. अश्विनी आणि अनिशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांना न्याय हवा आहे. दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या मुलाकडून सदर अपघात घडला आहे त्या मुलाला मानसिक आघात आणि धक्का बसला आहे.
धक्कादायक! सांबारमध्ये आढळला मृत उंदीर
१७ वर्षे आठ महिन्यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमी वेगाने आपल्या आलिशान कारने अनिश कुडिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला. अनिशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिश दुडिया हा २४ वर्षीय तरुण होता. त्यानी पुण्यात इंजिनीअरिंग केले. गेल्या काही वर्षांपासून आयटी विभागातही कार्यरत होता. अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. डिनर वरून घरी परतत असताना हे दोघे दुचाकीवरून निघाल्यानंतर काही सेकंदात भरधाव वेगात आलेल्या पोर्शने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
अपघाताला कारणीभूत असलेल्या मुलाला सुरुवातीला अटक करण्यात आली. त्यानंतर अपघात कसा घडला यावर 300 शब्दांचा निबंध लिहावा या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. हा निर्णय समजल्यानंतर, सोशल मीडियाने त्या मुलावर आणि न्यायाधीशावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची टीका केली. शिवाय गरीब माणसाच्या मुलाला एवढ्या सहजासहजी सोडले असते का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर, मुलाला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. त्याची अंतिम मुदत 25 जून आहे. त्याच्या सुटकेसाठी युक्तिवाद करताना, न्यायालयाने असे मत व्यक्त केले की मुलगा देखील मानसिकदृष्ट्या खचला आहे त्याला वेळ देण्यात यावी.