21 C
New York

Police Bharti : पोलीस भरतीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा!

Published:

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची (Police Bharti)चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य सरकारने भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या तोंडावर सुरु केली. पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे मैदानावर चिखल झाला. जिथे पाऊस पडला तिथे पोलीस भरती प्रक्रियेला ब्रेक लागला.

Police Bharti काय म्हणाले फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व स्थितीचा आढावा घेत पोलीस भरतीविषयी भाष्य केले आहे.राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, तसेच त्यापुढे आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे या चाचण्या खूप पुढे ढकलल्यामुळे तरुणांचं मोठं नुकसानं होऊ शकतं. अनेक लोकांसाठी ही वयामुळे शेवटची संधी देखील असू शकते. त्यामुळे ज्या युनिटमध्ये पाऊस नाही त्याठिकाणी चाचण्या सुरु असून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्यांना पुढील तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच परिक्षाच्यासाठी येणाऱ्या मुलांसाठी मंगल कार्यालयामध्ये किंवा सभागृहामध्ये व्यवस्था करण्यात यावी” अशा देखील सूचना देण्यात आल्या असल्याचं असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.

एकाच वर्षात स्वीस बँकांमधील भारतीयांची ‘माया’ कमालीची घटली

Police Bharti पोलिसांच्या संकेतस्थळावर माहिती

नांदेड पोलीस दलातील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू झाली. 134 जागेसाठी 15 हजार 200 अर्ज आले आहेत. आज मैदानी चाचणी होणार होती परंतु पाऊस पडल्यामुळे ही चाचणी पुढे ढकलन्यात आली आहे. आज ज्याची चाचणी होती त्यांना पुढील तारीख देण्यात येणार आहे. या विषयीची सर्व माहिती ही नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.

Police Bharti भरतीसाठी लाखो उमेदवार

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे. त्यात अनेक ठिकाणी पावसामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img