4.2 C
New York

Ahmedabad Restaurant: धक्कादायक! सांबारमध्ये आढळला मृत उंदीर

Published:

Ahmedabad Restaurant: बंगळुरूमध्ये अमेझॉनच्या पार्सल बॉक्समध्ये साप आढळून आला, तर हर्षी चॉकलेटमध्ये मृत उंदीर आढळला तसंच आईस्क्रिममध्ये माणसाचं बोट आढळल्याचा प्रकार उघड झाला या सगळ्या घटना ताज्या असताना आता अशीच एक बातमी गुजरातमधून समोर आली आहे. अहमदाबाद येथील प्रसिद्ध असणार देवी हॉटेलमध्ये सांबाराच्या वाटीमध्ये मृत उंदीर आढळून आला आहे.

गुजरातमधल्या देवी हॉटेलमधला प्रकार
Ahmedabad Restaurant: अहमदाबाद मधलं देवी डोसा हॉटेल हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये सगळे साऊथ इंडियनचे पदार्थ मिळतात. या ठिकाणी लोक आवडीने पदार्थ खायला येतात. आता ह्या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये सांबारामध्ये मृत उंदीर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देवी हॉटेलमध्ये ईडली, डोसा, उत्तपा तसंच इतर दाक्षिणात्य सगळे पदार्थ खायला मिळतात आणि या ठिकाणी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. अहमदाबादमध्ये निकोल या भागात देवी डोसा सेंटर हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नास्ता करण्यासाठी लोक नेहमीच येत असतात. या हॉटेलमधली चव खास असल्यामुळे हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे असं सांगितलं जातं. आता याच हॉटेलमध्ये अशी धक्कादायक घटना घडली आहे.

अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन!

नेमकं काय प्रकार घडला?
देवी हॉटेलमध्ये एका ग्राहकाने डोसा आणि इडली मागवली होती. त्यामध्ये असलेल्या सांबार वाटीत उंदीर आढळला. ही घटना घडल्यानंतर ग्राहकाने ताबडतोब महापालिकेत धाव घेतली आहे. ग्राहकाने अन्न, औषध प्रशासनाकडे आणि आरोग्य विभागाकडे तक्रार मांडली आहे. या हॉटेलला आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. जेव्हा या हॉटेलची पाहणी करण्यात आली तेव्हा सांबार, चटणी व इतर पदार्थ उघड्यावर ठेवण्याचेही दिसून आलं. आणि याच ठिकाणाहून हे सर्व पदार्थ लोकांना दिले जात होतं असंही दिसण्यात आलं. त्यामुळेच सांबारमध्ये उंदीर पडला असण्याची शक्यता आहे असंही लोकांनी व्हिडिओ पाहून म्हंटल आहे. हा व्हिडिओ अहमदाबाद अपडेट्स या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी भाविन जोशी यांनी काय सांगितलं?
अन्न सुरक्षा अधिकारी भावीण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या प्रकारावर अहमदाबाद महापालिकेने तातडीने लक्ष द्यायला हवं, तसंच अशा घटना टाळण्यासाठी आणि ग्राहकांना याचा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया कशा?
ज्या ग्राहकाने या हॉटेलमध्ये जाऊन डोसा आणि इडली खाल्ली आहे त्याने या सर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सांबारात आढळलेल्या या मृत उंदराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर लोकांच्या कमेंटही येत आहेत. नेटकऱ्यांनी हॉटेल्स चालवणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावलं आहे. टेबलाच्या खालून पैसे घेऊन असल्या हॉटेल्सना संमती देऊ नका आणि लोकांच्या जीवनाशी खेळू नका असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. कोणताही पदार्थ खाण्याआधी विचार केला पाहिजे. दिवसेंदिवस खाण्याचा दर्जा बिघडत चालला आहे असंसुद्धा काहींनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img