लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता सहकारी संस्थांच्या (Co-operative Societies) विशेषत: बाजार समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार होते. मात्र, सहकार खात्याने यंदा पाऊसकाळ लक्षात घेऊन पुन्हा एकदा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निवडणुका 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73 कब मधील तरतुदीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबवण्यात येते. या निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून 12 जूनला पत्राद्वारे शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यात 2024-25 या वर्षात 24,710 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याची बाब समोर आली. त्यापैकी 8305 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र पावसामुळे या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जम्मूकाश्मीरमध्ये लवकरच होणार विधानसभा निवडणूक
बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड आणि इतर शेतीविषयक कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळं शेतकरी सभासद असलेलय्ा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठी अडचणी येण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाळा संपेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 8305 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वीही अनेक कारणे दाखवून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
Co-operative Societies यापूर्वीही दिली होती स्थगिती..
देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असतांना उच्च न्यायालयाने 31 मे 2024 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांवना स्थगिती दिली होती. सुमारे 38 हजार 740 सहकारी संस्थांच्या निवडणुकांला कोर्टाने स्थगिती दिली होती.