9.5 C
New York

IND vs AFG : टीम इंडियाकडून अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव

Published:

टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने (Team India Beat Afghanistan) अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव केला. सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना भारताने जिंकत विजयी सुरुवात केली (IND vs AFG) आहे. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला. सुपर 8 फेरीत दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या विजयानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना 22 जून रोजी बांगलादेश विरुद्ध (Bangladesh) होणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊन मधील केनिंग्जटन स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने वीस ओव्हर्समध्ये 181 धावा केल्या. अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी 182 धावांचे आव्हान होते. अफगाणिस्तानला मात्र हे आव्हान साधता आले नाही. अफगाणिस्तानचा अख्खा संघ फक्त 134 रन बनवून ऑल आऊट झाला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने शानदार (Jasprit Bumrah) गोलंदाजी केली. अफगाणिस्तानकडून उमरजईने सर्वाधिक 26 धावा केल्या. त्याच्यानंतर एकही फलंदाजाने 20 पेक्षा जास्त रन केले नाहीत. बुमराह आणि अर्शदिप सिंह (Arshadeep Singh) या दोघांनी प्रत्येक तीन तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) दोन विकेट मिळवल्या. तर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी एक एक विकेट मिळवल्या.

येत्या ३ ते ४ तासांत राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस

या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब राहिली. संघाचा स्कोर 11 असताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात पहिला धक्का बसला आहे. यानंतर रिषभ पंत आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांनी डावाला आकार दिला. यानंतर 90 रनावर 4 विकेट गमावल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आणि हार्दिक पंड्या या (Hardik Pandya) दोघांनी डावाला आकार दिला. दोघांनी 60 धावांची भागीदारी केली. यानंतर सूर्य 53 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने 32 धावा केल्या होत्या. या फलंदाजांमुळे भारताला 181 धावा करता आल्या. अफगाणिस्तानसाठी रशीद खान (Rashid Khan) आणि फजलहक फारुकीन प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

दरम्यान याआधी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले होते. त्यानंतर या टी 20 विश्वचषकातही आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. आता भारताचा पुढील सामना बांग्लादेशबरोबर होणार आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघ सेमी फायनलमध्ये एन्ट्री घेणार आहे. सध्या भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे अशीच कामगिरी कायम ठेवल्यास यंदा विश्वचषक विजेता ठरू शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img