19 C
New York

Barshi firecracker blast : वटपौर्णिमेच्या दिवशी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

Published:

सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Barshi firecracker blast) बार्शी तालुक्यातील घारी गावात फटका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी गावात युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा फटाका कारखाना आहे. या कारखान्यात १५ महिला मजूर काम करतात. आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे महिला कामावर आल्यात नाहीत. त्यामुळे कारखाना बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास या कारखान्याला अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. कारखान्यात फटाका बनवण्याचे साहित्य असल्याने क्षणार्धात आगीने संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. आगीमुळे कारखान्यात एकापाठोपाठ एक स्फोट झाले.

डोंबिवलीतील एमआयडीमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण स्फोटाची घटना घडली. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, केमिकल कंपन्यांमधील कामगार आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षा हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. तर, दुसरीकडे फटाके बनवणारे कारखाने आणि त्यांमधील कामगारांच्या (Labour) सुरक्षेचाही मुद्दा तेवढाच ऐरणीवर आहे. आता, पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील घारी (Barshi firecracker blast) गावात भीषण स्फोटाने परिसर हादरला आहे. सुदैवाने वट पौर्णिमेमुळे (Vat purnima) मोठा अनर्थ टळला असून दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

खडसेंची फडणवीसांना धक्का देत कमबॅकची तयारी?

Barshi firecracker blast महिला आज वटपौर्णिमेमुळे कामावर गेल्या नाही

आज वट पौर्णिमेचा दिवस, खरंतर जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा,आपल्या पतीला दिर्घायुष्य मिळावं, म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या घेऊन प्रार्थना करतात. आज, त्याच वटपौर्णिमेमुळे घारीतील फटाका कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना जीवनदान मिळाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, येथील फटाका कारखान्यात 15 महिला काम करत असल्याची माहिती आहे. या महिला आज वटपौर्णिमेमुळे कामावर गेल्या नाहीत.

Barshi firecracker blast गतवर्षीही झाला होता स्फोटो

बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये गतवर्षी जानेवारी महिन्यात फटका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. त्यामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 20 जण गंभीर जखमी झाले होते. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला होता. त्यानंतर, आता पुन्हा एकदा फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटाची घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img