19 C
New York

Heat Wave In India : 110 मृत्यू, 40 हजारांहून अधिक नागरिकांना स्ट्रोक

Published:

देशात मॉन्सूनचं आगमन होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी आजही देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट (Heat Wave In India) कायम आहे. देशभरात अनेकांनी या उष्णतेने आपला जीव गमावलाय. (Heat) मृत्यू झालेल्या लोकांची संख्या धक्कादायक आहे. (Temperature) मागिल तीन महिन्यांत अतिउष्णतेमुळे आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला आहे. (Heatstroke) तसंच, या वर्षी एक मार्च ते १८ जून या कालावधीत ४० हजारहून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला, असं आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं आहे.

Heat Wave In India काळजी घेण्याचं आवाहन

यामध्ये सर्वांत जास्त उष्णतेच्या लाटेचा फटका उत्तर प्रदेशला बसला आहे. राष्ट्रीय उष्मा-संबंधित आजार आणि मृत्यूचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे (एनसीडीसी) संकलित केलेल्या माहितीनुसार ३८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर बिहार, राजस्थान आणि ओडिशातही उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या राज्यांकडून अंतिम माहिती आली नसल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलय. दरम्यान, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही एनसीडीसी विभागाकडून करण्यात आलं आहे.

पोलीस भरतीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा!

Heat Wave In India विशेष उष्माघात विभाग सुरू

एनसीडीसी’च्या माहितीनुसार १८ जून रोजी एका दिवसात उष्माघाताने सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर उत्तर आणि पूर्व भारत महिनाभरापासून उष्णतेच्या लाटेचा सामना करंत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत असल्याने अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही केंद्र सरकारने रुग्णालयांना दिले आहेत. तसंच, देशभरातील परिस्थिती आणि रुग्णालयांची सज्जता याचा आढावा घेत आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी उष्णतेमुळे आजारी पडणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी विशेष उष्माघात विभाग सुरू करण्याचा आदेश दिले आहेत.

Heat Wave In India राष्ट्रीय कृती आराखडा

आरोग्य मंत्रालयाने ‘उष्णता लाट हंगाम २०२४’बद्दल राज्य आरोग्य विभागासाठी आरोग्य विभागाने मार्गदर्शिका जारी केली आहेत. यानुसार उष्माघात आणि उन्हामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी एक मार्चपासून दररोज सादर करण्याची सूचना हवामान बदल आणि मानवी आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रम (एनपीसीसीएचएच) मोहिमेतील अधिकाऱ्यांना केली आहे. उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखडा सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img