19.3 C
New York

Poisonous Liquor : तामिळनाडूत विषारी दारूचे ३२ बळी

Published:

तामिळनाडूतील कल्लाकुरीची जिल्ह्यात विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्याने ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७० हुन अधिक जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुदुच्चेरीमध्येही (Pudduchery) विषारी दारू प्यायल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने १५ जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उलट्या आणि अस्वस्थ वाटू लागल्याने तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातून बुधवारी रात्री मोठ्या संख्येने रुग्ण कल्लाकुरीची रुग्णालयात दाखल झाले.. याशिवाय विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागातील रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे रुग्ण दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता विषारी दारू प्यायल्यामुळे त्यांना त्रास झाल्याची शक्यता असल्याचे कल्लाकुरीचीचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी सांगितले.
या रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यातील काहींची प्रकृती गंभीर होती. उपचारांदरम्यान आत्तापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही ७० हुन अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Poisonous Liquor : मिथेनॉलचं प्रमाण अधिक

या प्रकरणाचा तामिळनाडू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ४९ वर्षीय गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी या व्यक्तीला अटक केली आहे. बेकायदेशीररीत्या दारू गाळून विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गोविंदराजकडून पोलिसांनी तब्बल २०० लिटर अरकचे कॅनही जप्त केले आहेत. या दारूचे नमुने तातडीने विल्लुपुरम येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यात विषारी घटक मिथेनॉलचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

Poisonous Liquor : समाज उद्ध्वस्त करणाऱ्यावर दया नाही

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, हा प्रकार होण्यासाठी जे कामचुकार अधिकारी कारणीभूत होते, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे”, असं स्टॅलिन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, जर लोकांनी अशा बेकायदेशीर दारू गाळपाच्या प्रकारांबाबत तक्रार केली, तर त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर अजिबात दया दाखवली जाणार नाही, असंही स्टॅलिन यांनी या निवेदनात स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img