26.6 C
New York

Laxman Hake:मुलाच्या पोटात अन्न नाही, अन्न गोड कसं लागणार ?

Published:

ओबीसी बांधवांच्या संघर्षासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे उपोषण सुरू आहे. अशातच त्यांच्या घरात चार दिवसांपासून स्टोव्ह पेटलेला नाही. लक्ष्मण हाके यांच्या आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. लक्ष्मण हाके यांनी आईची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही उपोषणाच्या ठिकाणी येऊ नका, असा संदेश दिला आहे. पण मुलाच्या पोटात अन्न नाही, अन्न गोड कसं लागणार ? असा सवाल लक्ष्मण हाके यांच्या आईने केला आहे. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

राज्यभरातील ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा

सरकारने आमच्या मुलाची लवकर दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे. असे लक्ष्मण हाके यांच्या आईने सांगितले आहे. आम्ही मराठ्यांना आरक्षण म्हणत नाही. मात्र ओबीसींना आरक्षण दिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी आहे ती त्यांनी मान्य करावी, असेही त्यांच्या आईने म्हटले आहे. एक एकर जमिनीवर आपला उदरनिर्वाह करणारे हाकेचे वडील मेंढ्या पाळण्याचे काम करतात. या मुलाची अवस्था पाहून ते चिंतेत असून, तो समाजासाठी लढत असताना सरकार लक्ष का देत नाही, असा सवालही त्यांनी केला. हाके कुटुंबीयांना आपल्या मुलाची काळजी असून आता राज्यभरातील ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येत आहे. आज जुजारपूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून गावात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाप्रमाणेच आपल्या मुलाच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी, अशी लक्ष्मण हाके यांच्या पालकांची इच्छा आहे.

आंदोलनाचा आज आठवा दिवस

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. उपोषणामुळे लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका संभवतो, अशी भीती डॉक्टरांना वाटते. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मात्र हाके यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img