26.6 C
New York

Mumbai Rain : येत्या ३ ते ४ तासांत राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस

Published:

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain) चांगलीच दाणादाण उडाली आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अद्याप हवा तसा चांगला पाऊस झालेला नाही. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३ ते ४ तासांत राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात पिवळा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img