26.6 C
New York

Mallakhamba: जास्तीत जास्त स्पर्धकांकडून मल्लखांबावर प्रात्यक्षिके विक्रमाची नोंद

Published:

राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त झाशी, उत्तर प्रदेश येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राणी लक्ष्मीबाई यांनी जगाला बलिदान, सामर्थ्य, निर्भीडपणे जगण्याची शिकवण दिली आणि तीच शिकवण लोकांमध्ये पुन्हा रुजवण्यासाठी शौर्य पर्व – 2 च्या निमित्ताने उत्तर प्रदेश लोक एवम जनजाती संस्था (सांस्कृतिक विभाग, लखनऊ, उत्तर प्रदेश) प्रमुख निदेशक श्री अतुल द्विवेदी आणि एम्येच्युर मल्लखांब (Mallakhamba) असोसिएशनचे अध्यक्ष संजीव कुमार सरावगी आणि सेक्रेटरी रवी प्रकाश परिहार यांच्या संयुक्त विद्यमाने राजा गंगाधरराव मुक्त काशी मंच, झाशी येथे सकाळी साडेसहा वाजता 350 पेक्षा जास्त मल्लखांब खेळाडू यांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी मल्लखांबावर विविध प्रात्यक्षिक करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. या रेकॉर्ड्समध्ये पाच ते अठरा वर्षापर्यंतच्या विविध मल्लखांब खेळाडूंनी भाग घेतला होता यामध्ये युवक आणि युवती या दोघांचाही सहभाग होता.
या जागतिक विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया ने घेतली असून संस्थेच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांना सन्मानित केले गेले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img