4.2 C
New York

Amhi Jarange Movie: ‘आम्ही जरांगे’ चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं! दिग्दर्शक म्हणतात…

Published:

Amhi Jarange Movie: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चळवळ उभी करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या आयुष्यावर आधाराची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अभिनेते मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) ‘आम्ही जरांगे’ (Amhi Jarange) या चित्रपटात मनोज जरांगेची भूमिका साकारत आहेत. १४ जून ला म्हणजेच गेल्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, आता चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाशीच संघर्ष करावा लागत असल्याने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं. त्याबद्धल चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात…
Amhi Jarange Movie: ‘आम्ही जरांगे’ चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसलेंनी चित्रपटाच्या आणि टीमच्या वतीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात आपल्याच हक्कांसाठी, मराठा समाजाच्या न्याय अधिकारांसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष करावा लागतोय. याच आंदोलनाच्या संघर्षाचा धगधगता इतिहास जगापुढे मांडण्यासाठी आज सेन्सर बोर्ड सोबत आपल्या ‘ आम्ही जरांगे ‘ या सिनेमाला ही संघर्ष करावा लागत आहे. पण एक लक्षात घ्या. संघर्ष जरी असला तरी विजय हा नेहमी
सत्याचा आणि चांगल्याचा होतो.”

श्रद्धा कपूरने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली?

योगेश यांनी पुढे लिहिलं, ” आमचा हेतू हा इतिहास आणि संघर्ष जगापुढे आणणे हा आहे. आणि तो नक्की पूर्ण होईल. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्यापाठी संपुर्ण समाज ढाल बनून उभा आहे तसाच तो या सिनेमाच्याही पाठीशी ऊभा राहील अशी खात्री आहे. लवकरच येत आहोत नव्या तारखेसह तुमच्या भेटीला!!” अशातच या चित्रपटात बरेच कलाकार झळकणार आहेत. ‘आम्ही जरांगे’ या चित्रपटात मकरंद देशपांडे मनोज जरांगेंची प्रमुख भूमिका साकारत असून प्रसाद ओक, सुबोध भावे, अजय पूरकर या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका दिसणार आहेत. चित्रपटाची नवी रिलीज डेट लवकरच समोर येईल अशी आशा चाहत्यांना आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img