Deepika Padukone: बॉलीवूडची मस्तानी म्हणजेच सर्वात लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) नेहमीच आपल्या खासगी, प्रोफेशनल, आणि चित्रपटांच्या भूमिकांमुळे चर्चेत असते. आता दीपिका ५ महिन्यांची गरोदर आहे. आई होणाऱ्या दीपिकाने बुधवारी संध्याकाळी तिचा आगमी चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) च्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली होती. दीपिकाने यावेळी काळ्या रंगाचा बॉडिकॉन ड्रेस परिधान केला होता त्यावेळी सर्वांचं लक्ष फक्त दीपिकाच्या बेबी बम्पनेच वेधून घेतलं होत. दीपिकाच्या बेबी बम्पवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. तर काहींनी ५ महिन्यांच्या गरोदरपणात तिने घातलेल्या हाय हिल्सवर संताप देखील व्यक्त केला आहे.
दीपिकावर नेटकरींचा संताप का ?
Deepika Padukone: बुधवारी, 19 जून रोजी झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ च्या इव्हेंटमध्ये ममा पदुकोनने काळ्या रंगाचं बॉडिकॉन ड्रेस परिधान केला होता आणि त्यावर काळ्या रंगाची हाय हिल्स घातली होती. दीपिकाने घातलेल्या हाय हिल्सवरून नेटकऱ्यांनी दीपिकाला खडेबोल सुनावले आहे. दीपिका ५ महिन्यांची गरोदर असून तिने अशा हाय हिल्स घातल्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. एका नेटकऱ्याने म्हंटल की, गरोदरपणामध्ये हाय हिल्स घालणं धोकादायक असत. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हंटल की, तुम्हाला कितीसुद्धा सुंदर, ग्लॅमरस दिसायचं असेलं तरी अशा अवस्थेत हाय हिल्स घालणं टाळायलाच हवं. दीपिकाच्या हाय हिल्सवर अनेकजणांनी प्रश्न उपस्थित केले.
प्रियांका चोप्राचा चित्रीकरणादरम्यान सेटवर अपघात
दीपिकाच्या चाहत्यांनी टीकाकारांवर केला हल्लाबोल
दीपिकाच्या हिल्स वरून तिच्यावर टीका करणारे आहेत तर दीपिकाचे चाहते देखील बरेच आहेत. कोणत्याही काळात मिस पादुकोणला सपोर्ट करणारे आहेत. या सगळ्यागोष्टीवर दीपिका पादुकोणच्या चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे. एकाने म्हंटल की, गरोदरपणात हाय हिल्समध्ये आपला तोल सांभाळता येत असेल तर काहीच हरकत नाहीये. दीपिका खूप सुंदर दिसतेय असं या चाहत्याने म्हंटल आहे. तर दुसऱ्याने म्हंटल की, उगाच अति काळजी करू नका तिला हाय हिल्स घालून वावरण्याची सवय आहे.
कधी रिलीज होतोय ‘कल्की 2898 एडी’?
दिग्दर्शन नाग अश्विन (Nag Ashwin) यांचा ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. चित्रपटात प्रभास, (Prabhas) दीपिका पदुकोण, (Deepika Padukone) अमिताभ बच्चन,(Amitabh bachhan) कमल हसन,(kamal Hassan) दिशा पटानी (Disha Patani) यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाकडून बॉलीवूड इंडस्ट्रीला बऱ्याच अपेक्षा आहेत. चित्रपटात प्रभास भैरवची भूमिका साकारत आहे तर अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.