10.9 C
New York

IIT Students: ‘त्या’ नाटकात सहभागी विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार रुपयांचा दंड

Published:

मार्चमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी) कला महोत्सवात काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘राहोवन’ या नाटकात हिंदू देवता श्रीराम आणि सीता यांचे विडंबन करण्यात आले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी या नाटकाला विरोध केला. त्याची दखल घेत आयआयटी, मुंबई प्रशासनाने १ लाच २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ठोठावण्यात आलेला दंड विद्यार्थ्याच्या एका सेमिस्टरच्या फी इतका असल्याची माहिती समोर येत आहे.

 ‘या’ खेळाडूंमुळे सौरभ भारतीय संघाबाहेर ?

31 मार्च रोजी आयआयटी मुंबई येथे झालेल्या आर्ट फेस्टिव्हलमध्ये हे नाटक सादर करण्यात आले. त्यानंतर 8 एप्रिल रोजी ‘आयआयटी बी फॉर भारत’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेने सोशल मीडियावर ‘एक्स’ या नाटकाचे विडंबन पोस्ट करून निषेध केला. या पोस्टमध्ये त्यांनी नाटकात रामायणाची खिल्ली उडवल्याचे म्हटले आहे. शिवाय सदर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याची दखल घेत आयआयटी प्रशासनाने ८ मे रोजी चौकशीसाठी समिती स्थापन केली. या समितीने विद्यार्थ्यांची तपासणी केली. या आरोपात तथ्य आढळल्यानंतर समितीने प्रशासनाला दंडात्मक कारवाईची शिफारस केली. त्यानुसार 4 जून रोजी आयआयटी प्रशासनाने या नाटकात सहभागी विद्यार्थ्यांना दंड आकारणारी नोटीस पाठवली. यामध्ये विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम 20 जुलै 2024 पर्यंत आयआयटी मुंबईच्या कुलपतींच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीदेखील बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश येईपर्यंत या सवलती थांबवल्या जातील, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आयआयटी बी फॉर भारत’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेने विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याबाबत ‘एक्स’ वर नोटीस पोस्ट करून संस्थेच्या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, प्रशासनाशी चर्चा करून काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा सादरकर्त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती, मात्र बुधवारी सोशल मीडियावर नोटीस प्रसिद्ध होताच ती आशा धुळीस मिळाली, असे कारवाई करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मित्रांनी सांगितले. समोर आलेल्या माहितीवरून असे समोर येते की, प्रेक्षक आणि स्पर्धेच्या ज्युरींनी रामायण आणि कथानकातील पात्रांची नावे बदलून स्त्रीवादी नाटक सादर करण्यात आल्याबद्दल कोणताही आक्षेप घेतला नाही. दरम्यान, आयआयटी, मुंबई प्रशासन सदर प्रकरणाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img