Munjya Movie: सध्या बॉलिवूडमध्ये मराठी दिग्दर्शकांची चांदी पाहायला मिळतेय. आदित्य सरपोतदार, (Aditya Sarpotdar) समीर विद्वंस, (Sameer Vidvans) यांसारख्या दिग्दर्शकांच्या कथा बॉलिवूडमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा आवडत असल्याचं चित्र आपल्याला बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतंय. अशातच काहीं दिवसांपूर्वी आलेला आदित्य सरपोतदार यांचा ‘मुंज्या’ (Munjya) हा चित्रपट त्यामधलाच एक आहे. मोठी स्टारडम नसतानाही कमी बजेट असणारा मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई केली आहे. अवघ्या ४ दिसांमध्ये या चित्रपटाने त्यांच्या बजेटची कसर भरून काढली आहे. पण मराठी दिग्दर्शकाचा हा चित्रपट मराठी भाषेत का बनवला नाही ? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावरती स्वतः दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी भाष्य केलं आहे.
Munjya Movie: मुंज्या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार असून आता हा चित्रपट १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे असं म्हंटल जातंय. कारण १० दिवसात या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळेच एका मराठी दिग्दर्शकाचा सिनेमा बॉलिवूडमध्ये सर्वात वरचढ ठरणार का याच चित्रही काहीच दिवसांत स्पष्ट होईल. पण आदित्य सरपोतदारने हे सुद्धा सांगितलं आहे की मुंज्या हा कोट्यवधी रुपयांचा टप्पा कसा काय गाठू शकला.
क्योंकी JNU मैं सरकार हमारी हैं!
‘मुंज्या’ मराठी भाषेत का बनवला नाही?
‘मुंज्या’ मराठीत का बनवला नाही यावर बोलताना आदित्य म्हणाले की, मला नेहमीच वाटत होत की ही कथा मराठीत झाली असती, पण मला अतिशय मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला नसता. मी उदाहरण देतो, कांतारा सिनेमा त्यांनी त्यांच्या भाषेत करून त्याला मास मध्ये रिलीज केलं. मी सुद्धा मुंज्या मराठीत करून ते करू शकलो असतो. परंतु आजही आपण जेव्हा एखादा मराठी चित्रपट मास रिलीज करायचं म्हंटल तर आजही त्याला मर्यादा आहेत आणि काही कारणं देखील आहेत.
पुढे ते म्हणाले की, मला ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची होती. हा चित्रपट मॅडॉकलाही हिंदी भाषेतच करायचा होता. मला सुद्धा ते हिंदी आणि मराठी करत बसण्यापेक्षा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं वाटत होत. मात्र मराठीतही चांगल्या कथा आहेतच की, ‘अल्याड पल्याड’ (allyad Pallyad) चित्रपटासारख्या. मी त्याच्याआधी झोंबिवली (Zombivali) चित्रपट केला होता तो मराठी भाषेतच केला. याउलट आता झोंबिवली हा चित्रपट हिंदीत करण्यासाठी विचारत आहेत. पण ती डोंबिवलीची गोष्ट असल्यामुळे तो चित्रपट मराठीतच व्हायला हवा होता. आता यानंतर जर चांगला चित्रपट आणि चांगली एखादी कथा सुचली तर मी ती मराठी भाषेतूनच करेन.