26.6 C
New York

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली?

Published:

Shraddha Kapoor: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या आगामी ‘स्त्री २’ (Stree 2) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलीवूडमधली लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धा कपूरने २०१३ मध्ये झळकलेला ‘आशिकी २'(Aashiqui 2) या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. आशिकी २ या पहिल्या चित्रपटात श्रद्धाने अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) सोबत मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्रीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर श्रद्धाच्या खासगी आयुष्याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. अभिनेत्रीच्या रिलेशनशिपवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते.

Shraddha Kapoor: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काही दिवसांपूर्वी जामनगर येथे प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. त्या प्री-वेडिंग सोहळ्याला श्रद्धा कपूरने तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत हजेरी लावली होती. इतकंच नव्हे तर श्रद्धाची विमानतळावर आदित्य रॉय कपूर याच्यासोबत सुद्धा भेट झालेली त्यावेळी श्रद्धाने राहुल मोदी (Rahul Mody) यांची सुद्धा भेट आदित्यसोबत घालून देतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याशिवायचं श्रद्धाने घातलेल्या ‘R’ अक्षराच्या पेंडंटचा फोटो सुद्धा व्हायरल झालेला. यावरून राहूल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. मात्र श्रद्धाने त्याबद्धल अद्याप कुठेही भाष्य केलं नव्हतं किंवा राहुलबरोबर एकही फोटो शेअर केला नव्हता. तर आता श्रद्धाच्या चाहत्यांना तिने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीवर राहुल अन् तिचा एकत्र फोटो शेअर करत आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

 प्रियांका चोप्राचा चित्रीकरणादरम्यान सेटवर अपघात

श्रद्धाने इंस्टग्रामवर शेअर केलेल्या स्टोरी मध्ये श्रद्धा आणि राहुल दोघेही कॅमेराकडे बघून स्माइल देत असल्याचं पाहायला मिळतंय. पण अभिनेत्रीने या सेल्फी फोटोला काहीस हटके असणारं कॅप्शन लिहिलं आहे. “दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार” असं लिहून याच्यापुढे श्रद्धाने हसण्याचे इमोजी जोडले आहेत. यादेखील श्रद्धाने स्टोरीला राहुलला सुद्धा टॅग केलं आहे. श्रद्धाची स्टोरी पाहून श्रद्धाने प्रेमाची जाहीर कबुली देत त्यांच्या गोड नात्यावर शिक्का मारल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

श्रद्धाने हा फोटो स्टोरीला शेअर करत “नींद चुराई मेरी किसने ओ सनम…” हे गाणं देखील लावलं आहे. राहुल मोदींच्या कामाबद्धल सांगायचं झालं, तर राहुल मोदी ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘तू झुठी में मक्कार’ या चित्रपटांचा लेखक आहे. तसंच राहुल मोदी हा सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम करतो.

दरम्यान, श्रद्धा कपूरचा आता लवकरच ‘स्त्री २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘स्त्री २’ हा बहुचर्चित चित्रपट येणाऱ्या १५ ऑगस्टला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसह राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी या सर्व कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img