10.2 C
New York

Govt Employee Retirement : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 55 करा,बुलंद छावा मराठा युवा परिषदेची मागणी

Published:

छ्त्रपती संभाजीनगर : राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 55 वर्षे करावे (Govt Employee Retirement) , अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषद आणि छावा कृती समितीने राज्य सरकारकडे केली आहे. परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे याबाबतचे निवेदन देण्यात आले.


मराठा युवा परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, राजपत्रित अधिकारी संघटना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचे आश्वासन दिले आहे. हे चुकीचे आहे. वास्तविक सरकारी कर्मचारी कामचुकारपणा करतात. जनतेला याचा मोठा मनस्ताप शन करावा लागतो. याउलट तरुणांना नोकरीची संधी दिली तर कामे अधिक कार्यक्षमतेने होतील. शिवाय बेरोजगारी कमी होईल.

शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’


राज्यात आधीच बेरोजगारी वाढत असताना सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवले तर बेकारी आणखी वाढेल. आधीच गेल्या 11 वर्षांपासून राज्यात सरकारी नोकर भरती झालेली नाही. त्यात निवृत्तीचे वय वाढवले तर सरकारी तिजोरीवर त्याचा आणखी भर पडेल. याबाबत संघटनेने गेल्या पाच वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा केला आहे, पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.


आमच्या मागणीचा विचार केला नाही तर संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. संघटनेचे प्रा. चंद्रकांत भरट, सुरेश वाकडे, मनोज गायके, सतीश वेताळ, विनोद बगळे, बाळासाहेब चौधरी, गणेश क्षीरसागर, संदीप जाधव, संदीप शेळके, अनिल तुपे, अमोल पाटील, शिवाजी भिंगारे यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img