राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी बारामती मधील कोऱ्हाळे खुर्द या गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना आवाहन केले. तसेच यावेळी त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar ) देखील टोला लगावला आहे. पवार म्हणाले की, ‘कोणी दम देईल. पण या वेळेला नेमकं बटन दाबलं तसं नेमकं बटन उद्याच्या निवडणुकीच्या काळात तुम्ही द्याल.’ असं म्हणत पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
तसेच पुढे पवार म्हणाले की, तुम्ही या ठिकाणी जसं काल मतदान केलं सुप्रिया ताईला त्याच पद्धतीने उद्याच्या पद्धती निवडणुकीत मतदान करा. कोणी सांगेल, कोणी रागवेल, कोणी दम देईल ठीक आहे येतील जातील बोलतील निघून जातील. जसे या वेळेला कोणी काही म्हटलं यांनी नेमकं बटन दाबलं तसं नेमकं बटन उद्याच्या निवडणुकीच्या काळात तुम्ही द्याल आपण बदल करून दाखवू आणि आणि तुमच्या मतदार संघाचं नावलौकिक सगळीकडे वाढवू एवढीच खात्री या ठिकाणी देतो.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
तसेच एकच काम मी असं ठरवलं काही झालं तरी उद्याच्या निवडणुकीत त्याच्यात महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची. महाराष्ट्रची सत्ता घेतल्यानंतर ऊसाला भाव कसा मिळत नाही? दुधाचे पैसे कसे मिळत नाहीत? हे सगळं बघतो, आता हा बघायचा अनुभव मला फार आहे. आज हिंदुस्थानामध्ये किंवा राज्यामध्ये 56 वर्ष सतत निवडून येणारा कोण माझ्याशिवाय कोणतरी दाखवा आणि हे काम तुम्हीच चमत्कार केलात. त्या चमत्काराचा फायदा तुमच्या संसारात कसा होईल? त्याच्याकडेच लक्ष देणार त्याच्याशिवाय काही नाही आणि ते काम उद्याच्या विधानसभेत तुम्ही करायचं. असं आवाहन पवारांनी या ग्रामस्थांना केलं आहे.