19.8 C
New York

 Jalganon : पाणीपुरी खाणं पडलं महागात, पाहा कसं ते…

Published:

पाणीपुरी खाणं हा बहुतेकांचा वीक पॉईंट असतो. पाणीपुरी खायला आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळचं असेल. पण हीच पाणीपुरी खाणं  (Jalganon)  जळगावच्या चोपडा गावातील लोकांना फार महागात पडलं. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव याठिकाणी पाणी पुरी खाल्ल्याने नागरिक आजारी पडल्याची घटना घडली आहे.आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे घडली. विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. विषबाधा झालेल्या ७० ते ३० रुग्णांवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर रुग्णांवर खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. पाणीपुरी खाल्ल्यामुळे त्रास झाला असल्याचं सोमनाथ जगन कोळी यांनी पोलिस स्टेशनमध्ये लेखी जबाब दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे काल आठवडे बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. अनेकांनी यावेळी बाजारात उघड्यावर विक्री होत असलेल्या पाणी पुरीचा आस्वाद घेतला. तर काहींनी घरी खायला पार्सल नेले. मात्र त्यानंतर काही वेळातच अनेक लोकांना त्रास होऊ लागला. अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. यामध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचं समजतय. आतापर्यंत जवळपास ८० हून अधिक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच रुग्णालयात वीज नसल्याने रुग्णांना अंधारातच उपचार घ्यावे लागले. महावितरणच्या यावेळी डॉक्टर पवन पाटील यांनी रूग्णांविषयी माहिती देताना म्हणाले, सदर रुग्ण यांना फूड पॉईझन झालं आहे. या रूग्णांवर प्राथमिक उपचार केले आहेत.

मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार सुरु

संध्याकाळी नागरिकांना पाणीपुरी खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी सारखे त्रास होऊ लागले. काहींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. त्यानंतर संध्याकाळी रुग्णांची संख्या वाढतच गेली. कमळगाव, चांदसणी, मितावली, पिंप्रीसह आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांचा विषबाधा झालेल्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान, जवळपास ८० हून अधिक लोकांना विषबाधा झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोपडा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. बाधीतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img