21 C
New York

Rickshaw-Taxi Drivers : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Published:

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीला आता विधानसभा निवडणुकीला (Assembly Election)सामोरे जायचे आहे. त्यामुळे आता सरकाकडून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्यात रिक्षा, टॅक्सी चालवून (rickshaw-taxi drivers) आपली रोजीरोटी चालविणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 63 वर्षावरील चालकांना ग्रॅज्युईटी मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक चालकाला वर्षाला 300 रुपये म्हणजे प्रतिमहिना 25 रुपये जमा करावे लागतील तर त्यात उर्वरित भर शासनाकडून टाकण्यात येईल. त्यासाठी उद्योग, खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

आज शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी या महामंडळाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. यावेळी मंत्री दादाजी भुसे, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून दंड आकारला जात होता. तो यापुढे आकारला जाणार नाही. यासंदर्भातील निर्देश परिवहन विभागाचे आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना देण्यात आले. मात्र, नियम मोडल्यास नक्कीच दंड भरावा लागेल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.त्यासोबतच रिक्षा टॅक्सी चालकांसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ’ सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत?

रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिकायचे असेल त्याना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल, त्यांच्या मुलांना कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल. यासोबतच शासनाचा जर्मन सरकारसोबत चार लाख तंत्रकुशल मनुष्यबळ पुरवण्याचा करार झाला असून त्याअंतर्गत कुशल चालकांना परदेशी नोकरीसाठी जाण्याची संधी मिळेल. दररोज कमावून पोट भरणाऱ्या कष्टकरी वर्गाला दिलासा मिळावा यासाठी हे महामंडळ सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img