21 C
New York

Varsha Gaikwad : आणखी एका काँग्रेसच्या आमदाराचा राजीनामा

Published:

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपने उमेदवारी दिलेल्या आमदारांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवलेल्या आमदारांना खासदार बनण्याची संधी मिळाली. त्यामुळे, खासदार बनल्यानंतर आता या आमदारांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी सोलापूरच्या काँग्रेस आमदार (MLA) प्रणिती शिंदे आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा (Resignation) दिला होता.

आता, धारावी मतदारसंघातील आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, खासदार बनलेल्या राज्यातील 3 आमदारांनी राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार आहेत. त्यामुळे, विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ घटलं आहे. मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत?

आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणच्या आमदार प्रणिती शिंदे यापूर्वी राजीनामा दिलेल्या या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड ह्या 29 उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन खासदार बनल्या आहेत, म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर, बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून 19731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, हे तिन्ही आमदार आता खासदार बनून दिल्लीत जात आहेत. दरम्यान, निलेश लंके यांनी अगोदरच आपला राजीनामा दिला होता.

Varsha Gaikwad हे तीन आमदार देणार राजीनामा

प्रतिभा धानोरकर – वर्धा
संदीपान भुमरे- संभाजीनगर
रवींद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img