21 C
New York

Accident: चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात

Published:

पंढरपुर हद्दीमध्ये भीषण अपघाताची (Accident) बातमी समोर येत आहे. भरधाव येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर-कराड मार्गावरील कटफळ येथे हा भीषण अपघात झाला. यात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मृत व जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत. या महिला चिकमहूड ला शेतात मजुरीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम आटोपून दुपारी घरी जाण्यासाठी ती पंढरपूर – कराड रस्त्यावर एसटीची वाट पाहत होती. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. हा भीषण अपघात आज दुपारी ४ वाजता घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट सातही महिलांना चिरडले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img