21 C
New York

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणी पोलिसांकडं भक्कम पुरावे

Published:

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणाने राज्यासह देशभरात खळबळ उडाली. (Pune Police) त्यातील कार चालक मुलासह अनेकजण या प्रकरणात अटक आहेत. (Pune Accident) आता यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. (Indian Schools) यातील अल्पवयीन आरोपीसह इतर आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भक्कम तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत.

Pune Car Accident आरोपपत्र दाखल होणार

या पुराव्यांवमध्ये पोलिसांनी आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) आणि साधारण 40 जणांचे जबाब घेतले आहेत. आरटीओ कार्यालयाकडून पोर्श मोटारीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा

Pune Car Accident सीसीटीव्ही चित्रीकरण

कोझी आणि ब्लॅक पबमध्ये अल्पवयीन आरोपी मद्यसेवन करत असल्याचं सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी जप्त केलं आहे. रात्री पार्टीला जाण्यापूर्वी तो स्वत: मोटार चालवत होता. अपघाताच्या वेळी तोच मोटार चालवत असल्याचंही तपासात समोर आलं आहे. अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणाऱ्या हॉटेल कोझीचा मालक नमन भुतडा, प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक पबचा व्यवस्थापक सचिन सांगळे, जितेश शेवानी, जयेश बोनक सध्या अटकेत आहेत.

Pune Car Accident रक्ताचे नमुने बदलल्याचा पुरावा

पोर्श कार अपघात प्रकरणी १७ वर्षे आठ महिने वयाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांच्या वैद्यकीय तपासणीवेळी त्यांच्या रक्ताचा नमुना ससून रुग्णालयात बदलला होता. याबाबत न्यायवैद्यक शास्त्र विभागाकडून पोलिसांना पुरावा प्राप्त झाला आहे.

Pune Car Accident तपास अधिकाऱ्यांत समन्वय

मोटार चालकाचं अपहरण करून त्याच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचा वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या आरोपींविरुद्ध असलेल्या सर्व गुन्ह्यांच्या तपासात समन्वय राहावा, यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्ह्यांचा एकत्रित तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img