19.7 C
New York

Police Bharti : राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती

Published:

राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती (Police Bharti) प्रक्रियेला बुधवार, 19 जूनपासून सुरुवात होणार आहे. तब्बल 17 हजार 471 जागांसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पोलीस विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात आली होती. ज्यानंतर आता अखेरीस एकूण 17 लाख 76 हजार 256 अर्ज मिळाले आहेत. त्यामुळे बुधवारपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (Maharashtra Police Bharti recruitment in state starts from June 19)

या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस दलातील विविध विभागांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये बँड्समन पदातील 41 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या 41 जागांकरिता तब्बल 32 हजार 26 अर्ज मिळाले आहेत. तर, तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या 1800 जागांसाठी 03 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. त्यामुळे या पदाच्या एका जागेसाठी सुमारे 207 जणांनी आपले अर्ज भरले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

महापारेषणची पदभरती रद्द, परीक्षार्थींचा संताप

तर, पोलीस विभागातील चालक या पदासाठी देखील अर्द मागविण्यात आले होते. यामध्ये 01 हजार 686 जागा रिक्त असून यासाठी एकूण 01 लाख 98 हजार 300 म्हणजेच एका जागेमागे सुमारे 117 अर्ज भरण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे. सर्वाधिक जागा या पोलीस शिपाई या पदाच्या रिक्त असून सर्वाधिक अर्ज देखील याच पदासाठी आले आहेत. पोलीस शिपाई पदाच्या 09 हजार 595 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 08 लाख 22 हजार 984 अर्ज भरण्यात आले आहेत. ज्यामुळे पोलीस शिपाईच्या एका जागेसाठी एकूण 86 उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे.

शीघ्र कृती दलातील 04 हजार 349 जागांसाठी सुद्धा पोलीस विभागाकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तब्बल 03 लाख 50 हजाप 592 इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्यात आले असून एका जागेसाठी एकूण 80 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ज्यामुळे या पदासाछी सुद्धा मोठी स्पर्धा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या पोलीस भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. तर, काही उमेदवारांनी शासकिय नोकरीचे आकर्षणाने सुद्धा हे अर्ज भरले असावेत, ज्यामुळे इतके अर्ज भरण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

Police Bharti भरतीवर पावसाचे सावट…

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस पडल्यास त्या विद्यार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. तर उमेदवाराने एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणे अपेक्षित असून विविध पदांसाठी फॉर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, असेही पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img