8.8 C
New York

Cricket Retirement : न्यूझीलंडच्या ‘या’ स्टार खेळाडूने केला क्रिकेटला रामराम

Published:

न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची (Cricket Retirement) घोषणा केली. यंदाच्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर तडकाफडकी ट्रेंट बोल्टने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ट्रेंट बोल्टने १३ वर्षे न्यूझीलंडचा सलामीचा वेगवान गोलंदाज म्हणून मैदान गाजवले. पहिल्या षटकाचा राजा आणि फलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरूदं त्याला मिळाली. मात्र टी२० विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने निवृत्ती स्वीकारली. दिग्गज संघांना दुबळ्या संघानी आस्मान दाखवले. याचाच फटका शांत प्रतिमेच्या न्यूझीलंडला बसला आणि न्यूझीलंडचा संघ तब्बल 37 वर्षांची वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत बाहेर पडला. अशातच न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का बसला असून वेगवगान गोलंदाज ट्रेंट बोल्टने टी20 वर्ल्ड कपमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

पापुआ न्यू गिनी विरूद्धचा सामना हा त्याचा शेवटचा सामना होता. ट्रेंट बोल्टने १३ वर्षे न्यूझीलंडचा सलामीचा वेगवान गोलंदाज म्हणून मैदान गाजवले. पहिल्या षटकाचा राजा आणि फलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरूदं त्याला मिळाली. मात्र टी२० विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने निवृत्ती स्वीकारली. पापुआ न्यू गिनी विरूद्धचा सामना हा त्याचा शेवटचा सामना होता. नेदरलँड्स क्रिकेट टीम कायम उलटउेर करण्यासाठी चर्चेत असते. या स्पर्धेतही नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला टफ फाईट दिली. नेदरलँड्सला 4 पैकी नेपाळ विरुद्धचा एकमेव सामना जिंकता आला. मात्र नेदरलँड्सला सुपर 8 मध्ये पोहचता आलं नाही.

जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या पात्रता यादीत पाच भारतीय शाळा

तो म्हणाला, “मला फक्त एवढचं म्हणायच आहे की, हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप आहे. आम्हाला अशा पद्धतीची सुरुवात अपेक्षित नव्हती. हे पचवण खूप अवघड आहे. स्पर्धेत पुढे जाऊ न शकल्यामुळे आम्ही सर्व निराश आहोत. परंतू जेव्हा तुम्हाला देशासाठी खेळण्याची संधी मिळते तेव्हा ती एक अभिमानाची गोष्ट असते”, अ निवृत्त होण्याची जाणीव थोडीशी विचित्र असते. गेल्या दोन दिवसापासून मला अस्वस्थ वाटत आहे. माझा आजचा सामना हा न्यूझीलंडसोबतचा शेवटचा सामना होता. मला यापेक्षा जास्त काय बोलावं हे काहीच सुचत नाही. आता माझी तशी मनस्थितीही नाही. असं म्हणतं त्याने निवृत्तीची घोषणा केली.

न्यूझीलंडचा शेवटचा सामना १७ जून रोजी होणार आहे. हा त्याच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा सामना असणार आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर करो या मरो सामन्यात न्यूझीलंडला १५० धावांची गरज होती. मात्र या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अपयशी ठरला होता. या गटातून अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिजने सलग ३-३ सामने जिंकले. यासह सुपर ८ चं तिकीट मिळवलं. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यानंतर बोल्टने घोषणा केली होती, की हा त्याचा शेवटचा टी-२० वर्ल्डकप असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img