23.1 C
New York

Ravindra Waikar : राज ठाकरेंच्या भेटीसाठी खासदार रवींद्र वायकर ‘शिवतीर्थ’वर

Published:

शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत विजय मिळवत शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. पण या विजयावरून आता मोठे रणकंदन माजले आहे. विरोधकांनी वायकरांचा विजय हा बोगस असल्याची टीका सुरू केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या विजयावरून आता ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. याच मुद्द्यावरून आता शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तुम्हाला जिथे जायचे तिथे जा, पण माझ्याविरोधातील खोटा प्रचार थांबवा, असे वायकरांकडून सांगण्यात आले आहे. (Ravindra Waikar warning to opposition on the lok sabha election results)

खासदार रवींद्र वायकर हे आज मंगळवारी (ताय 18 जून) शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही सदिच्छा भेट होती असे सांगत त्यांनी निवडणूक निकालाबाबत म्हटले की, मशीन हॅक झाली असती तर, भाजपाने 400 पारचा नारा दिल्याप्रमाणे त्यांच्या तितक्या जागा आल्या असत्या. पण तसे झालेले नाही. मोबाइलच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक होते हे सिद्ध केले तर देश नाही जगातही कळेल असे काही होतं म्हणून. आरोप करणाऱ्यांनी हे खरे करून दाखवावे. कोर्टात जावे. लोकशाही आहे. कोणी कुठेही जावे. मोबाईल हा प्रत्येकाकडे असतो. मोबाईल टॉवर चेक केले तर मतदान केंद्रात त्या दिवशी किती लोकांकडे मोबाईल होते हे कळेल. पण ते हॅक केले जाते हे सिद्ध झाले तर त्यातून खूप मोठे काही कळू शकते, असे वायकरांकडून सांगण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर; 12 जुलैला मतदान

Ravindra Waikar संजय राऊतांना प्रत्युत्तर…

खासदारकीची शपथ म्हणजे ही काही आईची शपथ, वडिलांची शपथ, देवाची शपथ नाही. तुम्ही पराजय मोठेपणाने पचवायला शिकले पाहिजे. मी पराभूत झाल्यावरही अमोल कीर्तिकर यांना सॉरी म्हटले. मला कोणाला दुखवायचे नाही. पण मला टार्गेट केले जात आहे. माझ्या विरोधात निगेटिव्हिटी करण्यात आली आहे. त्यांना मुलाला विधानसभेला उभे करायचे असेल. त्यामुळे माझी बदनामी करण्यात येत आहे, असा आरोप वायकरांनी कीर्तिकरांना केला आहे.

Ravindra Waikar कीर्तिकरांना कोणी विजयी घोषित केले?

मतमोजणीच्या दिवशी नेमके काय झाले? हे सांगताना खासदार रवींद्र वायकर म्हणाले की, आम्ही टीव्हीवर निकाल पाहत होतो. 5.41 वाजता 2 हजार 200 मतांनी अमोल कीर्तिकर विजयी झाले असल्याची बातमी टीव्हीवर पाहिली. मला याबाबत निवडणूक आयोगाकडून काहीच कळवले नव्हते. त्यामुळे कीर्तिकर विजयी कसे होऊ शकतात? याचा संशय आला. त्यामुळे मीही प्रयत्न केला. मी तिथल्या अधिकाऱ्याला विचारले. काही प्रसार माध्यमांना विचारले. पण एक लाखाच्या वर मते मोजायची बाकी होती. तरीही कीर्तिकर विजयी झाल्याची बातमी चालवली, पण त्यांना विजयी कोणी घोषित केले? याचा तपास झाला पाहिजे, असे म्हणत वायकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

तर, प्रत्येक टेबलच कॅलक्यूलेशन सुरू असताना 20 उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आत होते. मी आत नव्हतो. तिथे अनेकांकडे मोबाइल होते. टीव्हीवाल्यांकडेही मोबाइल होते. मग त्या सर्वांनी मशीन हॅक केली का? निवडणुकीच्या 13 दिवसांमध्ये मी काम केल. माझे रेप्युटेशन होते. कामाचा ब्रँड होता. मी वर्कहोलिक आहे. अल्कोहोलिक नाही यांच्या सारखा. माझ्याविरोधात खोटा प्रचार सुरू आहे. तो थांबवा. कोर्टात जायचे तिथे जा. मी काही म्हणणार नाही, असेही वायकरांकडून विरोधकांना सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img