3 C
New York

Car Accident : रील बनवणं जीवावर बेतलं, 500 मीटर दरीत कोसळून मृत्यू

Published:

रील बनववण जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. (Car Accident) मित्रासोबत मोबाईलवर रील बनवताना युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (PM Modi) कार चालवताना ॲक्सिलरेटरवर पाय पडून कार वेगात मागच्या सुमारे ५०० मीटर दरीत कोसळी. (Reel) या अपघातातच युवतीचा मृत्या झाला. तर कारचा चक्काचूर झाला. श्वेता दीपक सुरवसे (२३) रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर असं मृत युवतीचं नाव आहे.

Car Accident कार चालवून बघते

मित्र शिवराज संजय मुळे आणि श्वेता सुरवसे हे छत्रपती संभाजीनगर येथून कारने (एमएच २१ बीएच ०९५८) शूलिभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते. ते मोबाइलवर फोटो काढण्यासह या ठिकाणी रील्स बनवत होते. श्वेताने शिवराजला ‘मी पण कार चालवून बघते, तू शूटिंग कर, असं म्हणत ती ड्रायव्हिंग सीटवर बसली.

महापारेषणची पदभरती रद्द, परीक्षार्थींचा संताप

Car Accident थांब म्हणेपर्यंत कार दरीत

कार चालू करून या वेळी ती रिव्हर्स गिअरमध्ये मागे नेत होती. मात्र, दरी जवळ आली तरी तिला ब्रेक दाबता न आल्याने कार दरीत कोसळली. त्यामध्ये तीला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, कार दरीत पडण्याची शक्यता दिसताच शिवराज श्वेताला ‘थांब थांब असं जोरात ओरड राहिला. मात्र, तोपर्यंत कार डोंगरावरून कोसळून मागील खोल दरीत कोसळली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img