JNU Trailer : सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर किंवा कोणाची बायोपिक यावरच चित्रपट बनवले जातात. आता एकीकडे रोमँटिक, बायोपिक आणि हॉरर कॉमेडी चित्रपटांची रांग लागलेली असताना दुसरीकडे राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘जेएनयू’ (JNU) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘मुंज्या’ (Munjya) आणि ‘चंदू चँपियन’ (Chandu Champion) या दोन चित्रपटांनंतर आता राजकीय आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारा संघर्ष ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ (Jahangir National Univercity) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
JNU Trailer : जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये होणारा संघर्ष, राजकारण, दोन वेगवेगळ्या राजकीय विचारधारा, विद्यार्थ्यांची चळवळ याची झलक पाहायला मिळत आहे. अशातच राजकीय परिस्थितीवर उघडपणे भाष्य करणारा JNU चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. JNU चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही रोखठोक वाक्य ही सध्याच्या राजकारणावर टोकदार भाष्य करणारी आहेत. या ट्रेलरमध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ बोडकेचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळतोय. सिद्धार्थ बोडके, उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे आणि शिवज्योती राजपूत या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
मोठा धक्का! अलका याज्ञिक पडल्या ‘व्हायरल अटॅकला बळी’.. काहीच ऐकू येईना
JNU सिनेमाचा रोखठोक ट्रेलर
JNU सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतंय की, JNU विद्यापीठात गटबाजीचं राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत. विद्यार्थ्यांमध्ये जातीवरुन गट पडलेले दिसतात. सिनियर विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांना भडकवण्याचं काम करून विद्यापीठात येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मतपरिवर्तन करतात हे पाहायला मिळतंय. पुढे स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यापीठात अनेक अनुचित प्रकार बघायला मिळतात. विद्यापाठीतलं वातावरण नंतर तापलेलं पाहायला मिळतं आणि हिंसाचारही पाहायला मिळतो. ट्रेलरमध्ये “अब हम लोग बोलेंगे भी और लड़ेंगे भी”, क्योंकी JNU मैं सरकार हमारी हैं! अशी रोखटोक वाक्य देखील दाखवण्यात आली आहेत. JNU च्या ट्रेलरमध्ये गंभीर विषय ज्वलंतपणे मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. ‘जेएनयू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले असून ‘झी स्टुडिओ’ आणि प्रतिमा दत्त यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
“तू माझा अभिमान आहेस सिद्धार्थ
‘जेएनयू’ या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो म्हणजेच सिद्धार्थ बोडके. अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारल्यानंतर सिद्धार्थ आता ‘जेएनयू’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच नवऱ्याच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत तितीक्षा तावडेने लिहिलंय की, “तू माझा अभिमान आहेस सिद्धार्थ… तू पडद्यावर एक वेगळीच जादू निर्माण करशील याची मला अगदी खात्री आहे. ‘जेएनयू’ चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होत आहे. नक्की बघा!” अशी पोस्ट शेअर करत तितीक्षाने पतीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सिद्धार्थ बोडकेने “आय लव्ह यू सो मच” अशी कमेंट तितीक्षाने शेअर केलेल्या ट्रेलरच्या या व्हिडीओवर केली आहे. सध्या तितीक्षा तावडे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. सिद्धार्थ बोडके महत्त्वाच्या भूमिकेत असणारा हा ‘जेएनयू’ चित्रपट येत्या २१ जूनला झळकणार आहे.