3.6 C
New York

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत?

Published:

लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. अद्यापपर्यंत फडणवीसांची ही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. पण फडणवीस त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आज (दि.) दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे फडणवीस बाबेर पडलेच तर, पुढे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी भाजपनं खास प्लॅनिंग करून ठेवल्याचे सांगितले जात आहे. (Three More Minister’s Of BJP Give Resignation With Fadnavis)

Maharashtra Politics भाजपचं खास प्लॅनिंग काय?

लोकसभेत मिळालेल्या फटक्यामागे भाजपाचे राज्यातील पक्षसंघटन कमकुवत असल्याचे दिसून आल्याने फडणवीस पक्षाच्या पक्ष संघटनेसाठी पूर्णवेळ काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी फडणवीसांना भाजप प्रदेशाध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही केवळ चर्चा असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जर असे झाले तर, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसबा निवडणुकीत भाजपला फायदा होईल असे बोलले जात आहे.

राज ठाकरेंच्या भेटीसाठी खासदार रवींद्र वायकर ‘शिवतीर्थ’वर

Maharashtra Politics फडणवीसांपाठोपाठ तीन मंत्रीही करणार रामराम?

एकीकडे पक्षसंघटनेच्या कामासाठी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा या मागणीवर फडणवीस ठाम असल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकड फडणवीसांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी काही वरिष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाला रामराम करणार असल्याचा इरादा पक्का केला असल्याची चर्चा आहे. यात चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार यांची नावे आघाडीवर आहेत. पण जोपर्यंत फडणवीसांच्या राजीनाम्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत या सर्वच चर्चाच असून, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Maharashtra Politics फडणवीसांच्या राजीनाम्याचा विषय संपला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडतील हा विषय आता संपला आहे. त्यांना विधीमंडळ गटाने विनंती केल्याने ते ऐकतील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे. फडणवीस सरकारमधून बाहेर पडून नाही तर सरकारमध्ये राहूनच काम करतील. आम्ही सर्वच आमदारांनी किंवा इतर नेत्यांनी फडणवीस यांना विनंती केली आहे असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img