2.4 C
New York

Tukaram Mundhe : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली …

Published:

राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणून ज्यांचं नाव डोळ्यासमोर येते ते आयएएस तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe). तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे. मात्र, तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळाला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी गतवर्षी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली (Transfer) झाली आहे.

विकास आयुक्त (असंघटित कामगार) (Labour) खात्याच्या सचिवपदीआता, त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्याच्याही सूचना त्यांना बदली आदेशात देण्यात आल्या आहेत. बदलीसंदर्भातील अधिकृत पत्रात सांगण्यात आलं आहे की, शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार, भाप्रसे यांच्याकडून सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा.

Tukaram Mundhe 16 वर्षांच्या कार्यकाळात 19 वेळा बदली

तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2005 मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आली. 16 वर्षांच्या कार्यकाळात विशेष म्हणजे त्यांची 19 वेळा बदली झाली होती. आता, पुन्हा एकदा त्यांनी बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याअगोदर अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. आता, आज पुन्हा त्यांनी बदली करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe तुकाराम मुंढे धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत

तुकाराम मुंडे त्याच्या प्रामाणिकपणासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणून ओळखले जाते. कारण तुकाराम मुंडे यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत २२ वेळा बदली झाली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे बदल्यांना सामोरे जावे लागल्याचं मानलं (IAS Officer) जातंय. कडक शिस्तीमुळे त्यांना अनेकदा अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केलीय. तुकाराम मुंढे एक शिस्तप्रिय अधिकारी असल्याचं मानलं जातं. मुंढे जिथे जातात तिथे दबदबा निर्माण करतात. त्यांनी नवी मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलेलं (Development Commissioner Unorganized Workers) आहे. त्यांच्या कामाच्या धडाक्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरते. तुकाराम मुंढे धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात.

तुकाराम मुंढे पहिल्या प्रयत्नात मेन्समध्ये फेल झाले. त्यांना 865 मार्क मिळाले. जे मेरिटपेक्षा फार कमी होते. यानंतर तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यात ते प्रिलिअम पास झाले पण मेन्समध्ये पुन्हा अपयश आलं. म्हणून तुकाराम मुंढे यांनी परत तिसरा प्रयत्न केला. यावेळी तुकाराम मुंढे यांनी प्रिलियम आणि मेन्स दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत पोहोचले. मुलाखत झाली पण अंतिम निवड झाली नाही. 2003 साली एमपीएससीचा अंतिम निकाल आला. तुकाराम मुंढे यांच्या यांचं क्लास 2 मध्ये सिलेक्शन झालं. 2004 साली तुकाराम मुंढे प्रिलिअम पास झाले, मेन्स पास होणार याची खात्री असल्याने त्यांनी मुलाखतीची तयारी सुरु केली. 2005 च्या एप्रिल-मे महिन्यात तुकाराम मुंढे यांची मुलाखत पार पडली. 11 मे 2005 रोजी अंतिम निकाल आला त्यावेळी तुकाराम मुंढे यांची भारतातील रँक 20 होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img