8 C
New York

Worlds Best School : जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या पात्रता यादीत पाच भारतीय शाळा

Published:

इंग्लंडमध्ये वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा (Worlds Best School) पुरस्कारांसाठी शाळांची यादी करण्यात आली आहे. विविध पारितोषिकांसाठी विविध श्रेणींमध्ये जगातील अव्वल दहा शाळांना नामांकन मिळाले आहे.विशेष म्हणजे यातील पाच शाळा या भारतातील आहेत. त्यातील एक शाळा ही मुंबईमधील आहेत. विशेष म्हणजे आदिवासी, वंचित घटकाच्या शिक्षणासाठी असलेल्या शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्या शाळांचा यात समावेश आहे. गेल्या आठवड्यात मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील शाळांना वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या शाळांना 50 हजार डॉलर बक्षीस निधी मिळणार आहेत.

संघटित, पर्यावरण, नव-नवीन उपक्रम, प्रतिकूलतेवर मात करणे, आरोग्यदायी जीवनासाठी मदत करणे या श्रेणींमध्ये हे पुरस्कार आहेत. इंग्लंडमधील T4 Education या संस्थेने कोविड काळात ही संकल्पना पुढे आणली होती. मध्य प्रदेशमधील सरकारी शाळा सीएम RISE मॉडेल एचएसएस, झाबुआ येथील ट्रेलब्लॅझिंग भारतीय शाळा, दिल्लीतील रायन इंटरनॅशनल स्कूल, रतलाममधील H S S विनोबा आंबेडकर नगर (मध्य प्रदेश), कालवी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल (मदुराई, तामिळनाडू) आणि मुंबई पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल या पाच शाळांचा या यादीत समावेश आहे. ज्या शाळा नावीण्यपूर्ण कल्पना राबवत आहेत. त्यातून अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात, अशा शाळांमधून आपण शिकू शकतो, असे टी-4 एज्युकेशनचे संस्थापक व जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार देणारे विकास पोटा यांनी म्हटले आहे.

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती

Worlds Best School मध्य प्रदेशमधील आदिवासी मुलांसाठीची शाळा यादीत

सरकारी सीएम RISE मॉडेल HSS, झाबुआ ही मध्य प्रदेशमधील एक सरकारी शाळा आहे. आरोग्य, शिक्षण, पोषण आहार आणि आदिवासी समाजातील मुलांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी ही शाळा ओळखली जात आहे. सपोर्टिंग हेल्दी लाईव्ह्स या श्रेणीतील जगातील सर्वोत्कृष्ट शाळेच्या पारितोषिकाच्या यादीत ही शाळा

Worlds Best School रायन इंटरनॅशनल स्कूल

दिल्लीतील वसंत कुंज येथील रायन इंटरनॅशनल स्कूलचा यात समावेश आहे. या माध्यमिक शाळेद्वारे एक स्वतंत्र बालवाडी चालविले जाते. तर हायड्रोपोनिक्स (जमिनीशिवाय शेती) आणि बायोगॅस संयंत्रांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे पाणीटंचाई आणि प्रदूषण दूर करते. “पर्यावरण कृती” श्रेणीतील टॉप 10 अंतिम स्पर्धकांमध्ये या शाळेची निवड झाली आहे.

आदिवासी मुलींसाठी स्थापन शाळा

GHSS विनोबा आंबेडकरनगर, रतलाम (मध्य प्रदेश) या सार्वजनिक शिक्षणातील नाविन्यपूर्ण पध्दतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या माध्यमिक शाळेद्वारे एक बालवाडी चालविले जाते. शिक्षण घेण्यासाठी इच्छुक नसलेल्या शहरी झोपडपट्टी समुदायातील आदिवासी मुलींसाठी ही शाळा स्थापन करण्यात आली. इनोव्हेशन या श्रेणीत अंतिम फेरीत निवड झाली आहे.

कालवी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल

तामिळनाडूतील मदुराई येथील कालवी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल एक स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था शिक्षण आणि खेळाद्वारे जीवन बदलण्यावर लक्ष केंद्रित करते. हे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी सक्षम करते. शाळेची “समुदाय सहयोग” श्रेणीतील जगातील सर्वोत्कृष्ट शाळेच्या पुरस्कारासाठी पहिल्या 10 अंतिम स्पर्धकांपैकी एक म्हणून निवड झाली आहे.

मुंबई पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल

मुंबईतील पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल (IGCSE) या शाळेचा यात समावेश आहे. ही बालवाडी आणि प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थी हे जंक फूड खात नाहीत. तसा प्रसार शाळेने विद्यार्थ्यांमध्ये केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते. विद्यार्थ्यांमधील निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी भरीव प्रयत्न केले आहेत. या शाळेचा आरोग्य श्रेणीत समावेश केला आहे. या शाळांची निवड करताना कठोर निकष लावण्यात आलेले आहे. पाच बक्षीस श्रेणींमध्ये निवडलेल्या सर्व शाळा गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या सार्वजनिक मतदानात भाग घेतील. एक्सेंचर, अमेरिकन एक्सप्रेस आणि लेमन फाऊंडेशन यांच्या भागीदारीतील शाळांना बक्षीसे देण्यात येणार आहे. विजेत्या शाळा नोव्हेंबरमध्ये जाहीर केल्या जाणार आहे. 50 हजार डॉलर बक्षीस निधी पाच श्रेणीतील विजेत्यांमध्ये समान रीतीने वितरीत केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img