– सुभाष हरचेकर
आयसीसीच्या नवव्या T20 World Cup स्पर्धेच्या साखळीचे चाळीस सामने सोमवारी आटोपले. भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, वेस्ट इंडिज, अमेरीका, अफगाणिस्तान आणि बांगला देश संघानी सुपर आठमध्ये प्रवेश केला. अ गटातून भारत आणि पाकिस्तान, ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, क गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज, ड गटातून दक्षिण आफ्रीका,बांगला देश संघांची विश्वचषक स्पर्धेतील आव्हाने कायम राहिली .
मात्र २००७ साली उपविजेता आणि २००९ साली विजेता ठरलेला आणि २०२२ साली उपविजेता ठरलेल्या पाकिस्तान संघास, २००९ आणि २०१२ साली उपविजेता ठरलेला श्रीलंका संघ तसेच २०२१ साली उपविजेता ठरलेला न्यूझीलंडचा संघ साखळीतच गारद झाले . यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील या धक्कादायक घटना होत्या. या मागची अनेक कारणे असली तरी अमेरीकेतील केंद्रांवर पडलेल्या पावसामुळे काही सामने रद्द करावे लागले आणि त्याचा फटका काही संघाना बसला.
न्यूझीलंडच्या ‘या’ स्टार खेळाडूने केला क्रिकेटला रामराम
त्याचप्रमाणे अमेरीकेतील नॉसा कौंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खराब खेळपट्टीवरही अनेक संघाना पराभव स्विकारावे लागले. श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ बाहेर गेले तर अफगाणिस्तान, अमेरीका बांगला देश संघानी आपापल्या गटातून पहिले दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली. आता आठ संघांतून दोन गट तयार करण्यात आले आहेत. यापैकी भारत, ऑस्ट्रेलिया,अफगाणिस्तान आणि बांगला देश हे संघ असून ब गटात दक्षिण आफ्रीका, वेस्ट इंडिज , इंग्लंड आणि अमेरीका हे संघ आहेत प्रत्येक संघ तीन सामने खेळेल आणि गुणांच्या तक्त्यातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. सुपर आठचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार असल्यामुळे सर्व सामने पावसाचा व्यत्ययाविना होतील अशी अपेक्षा आहे.