Alka Yagnik: ९० च्या दशकातील आपल्या आवाजाने वेड लावणाऱ्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांना एक दुर्मिळ आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा आजाराने अलका यांना सध्या दोन्ही कानांनी ऐकू येत नाही आहे. या आजाराची बातमी अलका यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर दिली आहे.
Alka Yagnik: अलका यांनी म्हटलंय की, विमानातून प्रवास करताना त्या बाहेर आल्या आणि त्यांना दोन्ही कानांनी काहीच ऐकायला येत नव्हतं असं त्यांनी म्हंटल. एका व्हायरल अटॅकनंतर त्यांना हा त्रास झाला. हा आजार एक मेंदूचा आहे जो खूप दुर्मिळ आहे, सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस (rare hearing disorder) असं निदान त्यांच्या डॉक्टरांनी केलं आहे. कानात सतत मोठ्या आवाजात ऐकल्याने मला ह्या आजाराला बळी जावं लागलंय असंदेखील म्हंटल्या. त्यामुळे त्यांना मोठ्याने हेडफोनवर (Headphone) गाणी ऐकणं टाळा असं आवाहन केलं आहे. अलका याज्ञिक यांच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी चिंता व्यक्त केली आहे. सोनू निगम, शंकर महादेवन, इला अरुण अशा अनेक गायकांनी अलका यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
कोणतीच नाराजी नाही! सोनाक्षीच्या मामांचा खुलासा
अलका याज्ञिक यांनी पोस्टमध्ये म्हंटल..
अलका यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, मला माझ्या डॉक्टरांनी विषाणूंच्या संसर्गाने रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस( rare hearing disorder) झाल्याचे निदान केलं आहे. आपल्याला काही ऐकू येत नसल्यामुळे मला अचानक धक्का बसला आहे. या आजाराशी आणि त्यातून समोर आपल्या परिस्थितीशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतेय असं अलका याज्ञिक यांनी सांगितलं.
माझी एक विनंती आहे, चाहत्यांसाठी व तरुण सहकाऱ्यांसाठी… मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी ऐकू नका असं आवाहन अलका यांनी केलं आहे. या सगळ्याबद्धल मी माझ्या व्यावसायिक जीवनामुळे माझ्या आरोग्याला झालेल्या हानीबद्दल एक दिवस नक्कीच येऊन संवाद साधेन. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे, मी माझं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करून लवकरच तुमच्याशी संवाद करायला येईन या आव्हानात्मक काळात मला तुमचा पाठिंबा, भरभरून प्रेम हे सर्व माझ्यासाठी खूप महत्वाचं असल्याचं अलका यांनी म्हंटल आहे.
५८ वर्षीय अलका याज्ञिक या लोकप्रिय भारतीय गायिका आहेत. अलका यांनी ९०चा काळ आपल्या आवाजाने गाजवला आहे. 90 च्या दशकात अलका याज्ञिक यांनी सुपरहिट चित्रपटातील गाणी गायली आहेत. परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, अगर तुम चाहो, चुरा के दिल मेरा, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे…ही सगळी गाणी अलका यांची अप्रतिम ठरलेली या सर्व गाण्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.