3.8 C
New York

Nana Patole : नाना पटोले यांचे चिखलात माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले

Published:

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर फार प्रेम करत असतात. कित्येक उदाहरण आपण याच प्रेमातून ते अनेक कृत्य करत असल्याचे यापूर्वी बघितले आहेत. मात्र, असाच काहीसा एक प्रकार अकोला जिल्ह्यातून (Akola News) समोर आला आहे. हा प्रकार घडला आहे तो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बाबतचा . मात्र, कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे नाना पटोले नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर झाले असे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. नाना पटोले यांनी वाडेगावात या कार्यक्रमानंतर मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं.

यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. चिखलातून मार्ग काढत त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी संत गजानन महाराजांचा दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क एका कार्यकर्त्यानं हाताने धुतलेय. विजय गुरव असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे या कृतीमूळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी एका वाक्यात ‘हा’ विषय संपवला

Nana Patole स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये – अमोल मिटकरी

नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतल्याचा प्रकार घडल्यानंतर या कृतीला राजकीय वर्तुळातून विरोध झाला नसता तरच नवल. एका कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता यासंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आलीय. नेते अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर हे कृत्य निंदाजनक आहे, यातून पक्षाची कार्यकर्त्याप्रती काय धारना आहे, हे या माध्यमातून दिसून येत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहण्यात आला आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार असून नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेणे, हा कार्यकर्त्यांचा एकप्रकारे अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतः ला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये. अशी बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img